पोटार्थी बनलेली माणसं...

माणसं शिकत गेली; तसं सुटत गेलं त्यांचं गाव. पोटार्थी बनलेली माणसं गेली जागतिकीकरणाच्या लाटेत वाहत आणि विसावली शहर नावाच्या अजस्र खुराड्यात.
पोटार्थी बनलेली माणसं...

माणसं शिकत गेली; तसं सुटत गेलं त्यांचं गाव. पोटार्थी बनलेली माणसं गेली जागतिकीकरणाच्या लाटेत वाहत आणि विसावली शहर नावाच्या अजस्र खुराड्यात. अजस्र यासाठी, की या पंज्यात अडकलेली माणसं इच्छा असूनही नाही करू शकत स्वतःची सुटका. शहराला येऊन मिळतात अनेक प्रवाह...! प्रवाह सुधारणावादाचा, आर्थिक समृद्धीचा, दारिद्र्यनिर्मूलनाचा, वैचारिक बदलाचा, नावीन्याच्या शोधाचा आणि आणखी कशाकशाचा. त्या प्रवाहांच्या काठावर वाढत जाते नवशहरी माणसांची वस्ती.

या वस्तीला येते बाजारपेठी स्वरूप आणि हा नव्याने रहिवासलेला बनतो त्यांचे गिऱ्हाइक. कपड्यांपासून राहणीमानापर्यंत आणि भुकेसाठी पोटात ढकलायच्या वस्तूपासून पायात घालायच्या चपलांपर्यंत होतो माणसात बदल. नखशिखांत बदललेली व्यक्ती मग इच्छा असो वा नसो करते या बदलांचं स्वागत.

पोटार्थी बनलेली माणसं...
Farmer Suicide : आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायांनी प्रबोधन करावे

स्वतःतले सामाजिक मागासलेपण झाकताना माणसं होतात आतून उघडी; पण नाही दिसत कोणाला त्यांचं हे नागवेपण. बदल हाच जीवनाचा असतो अविभाज्य भाग, असे समजून होते त्याची दमछाक. दमलेली माणसं विसावू पाहतात कोणाच्यातरी खांद्यावर. हे खांदे मात्र झालेले असतात दुरापास्त!

गावखेड्यातून शहरात आलेली ही नवी पिढी जगते अर्ध शहरी; अर्ध ग्रामीण बनून. स्वतःच्या या दोन्ही प्रतिमा जपताना त्याच्या जगण्याच्या आरशालाच जातो तडा आणि भंगतो त्याच्या पारदर्शक काचेचा पारा. त्याला दिसत राहतं त्याचंच रूप. हळूहळू तो स्वतःचीच विसरतो ओळख आणि शिकतो बिनचेहऱ्याचा बनून जगात वावरण्याची कला. कलेचं नातं असतं पोटाशी. पायात काळाचे चाळ घट्ट बांधून नाचताना; नसते पायांना मुभा थकण्याची.

श्‍वासांचे कितीतरी घुंगरू मूक बनून ओघळतात मंचावर, पण नसतो पोटार्थ्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ. शहरात येताना गावखेड्यात मागे राहिलेली माणसं होत जातात अंधुक-अंधुक. डोळ्यावर चढतो चष्मा. हा चष्मा काचेचा असला तर निदान जवळ जाऊन पटते आपल्या माणसांची ओळख. पण चुकून चढल्याच श्रीमंतीच्या, ऐश्‍वर्याच्या काचा चष्म्यावर; तर ही माणसं होतात अनोळखी. घरातलीच माणसं वाटू लागतात परकी.

म्हातारी माणसं ठरू लागतात अडगळ आणि होते त्यांची रवानगी वृद्धाश्रमात. म्हातारपणाची काठी म्हणत नातवाला जपू पाहणाऱ्या या पिढीला येते एकटेपण. बऱ्याचदा काठी हातात येण्याआधीच होते म्हातारपणाची आबाळ. ज्येष्ठांचे सुरू होतात क्लब. गप्पांचे रंगू लागतात फड. बदललेल्या पिढीपासून बदललेल्या गावखेड्यापर्यंत अगणित चर्चिले जातात विषय... अंथरूण-पांघरुणाची वळकटी डोळ्यातल्या पावसाने ओली होईपर्यंत!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com