Life : स्वीकारात आनंद आहे

अस्वीकारातून मानसिक संघर्ष उभा राहतो. संघर्ष आला की, जखमा टाळता येत नाहीत. कोण विजयी होईल कोण, पराजित हे निश्‍चित नसतं.
Life
LifeAgrowon

- रमेश वाघ

संघर्षाचं मूळ काय? अस्वीकार. एखादा देश अमुक एक भूमिका मांडतो. त्याला प्रतिपक्षाची स्वीकृती मिळत नाही.

त्यातून संघर्ष उभा  राहतो. संघर्षातून दुःखाची निर्मिती होते. हीच मांडणी मानवी जीवनालाही लागू होते.

अस्वीकारातून मानसिक संघर्ष उभा राहतो. संघर्ष आला की, जखमा टाळता येत नाहीत. कोण विजयी होईल कोण, पराजित हे निश्‍चित नसतं.

Life
Life : हे जीवन सुंदर आहे

परंतु जखमी मात्र प्रत्येक जण होतो. जखमा लवकर भरल्या नाहीत, तर त्या जीवघेण्या ठरतात. साधं उदाहरण घेऊयात. आपल्याला आपल्या रंगाचा स्वीकार करता येत नाही.

समाज आपल्याला आपल्या रंगावरून हिणवतो. आपल्याला कोणी रंगावरून हिणवू नये म्हणून आपण झटपट उजळपणा वगैरे देणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन विकत घेतो.

वास्तविक जे तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करतात, त्यांना तुमच्या रंगाशी कर्तव्य नसते, हे आपल्याला उमगतच नाही. कारण आपणच आपला स्वीकार केलेला नसतो.

स्वीकार झाला, की आदर उभा राहतो. आपल्या मताप्रमाणे जगाचा व्यवहार चालत नाही. नेहमीच आपला आवडता पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही.

Life
Life : देखणी ती जीवने...

नेहमीच आपल्याला हवी त्याप्रमाणे ड्रायव्हर गाडी चालवत नाही. आपल्याला हवा असतो तेव्हा, नेमका पाऊस पडत नाही.

आपल्याला नको असतात, तेव्हा घरात नेमके पाहुणे टपकतात. जेव्हा तुमची बेडवरून उठण्याचीही इच्छा नसते, तेव्हा तुमची लेक लडिवाळपणे बगिच्यात चालण्याचा आग्रह धरते.

अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपल्या मनाप्रमाणे कधीच घडत नसतात. तरीही आपण त्याबाबतीत कायम तक्रारीचा सूर लावून रडगाणे गात असतो.

आयुष्याचा जो क्षण आनंदाने घालवायचा, तो कोणालातरी दोष देण्यात वाया घालवला जातो. मनाला शांती तर मिळत नाहीच, उलट चिडचिड वाढते.

घडणाऱ्या घटना, प्रसंगांना जर आपण बदलवू शकत नसू, तर त्यांचा आहे तसा स्वीकार करण्यात शहाणपण आहे.

आपले आईवडील कसे असावेत, हे आपण ठरवू शकत नाही. आपला जोडीदार कसा असावा, हे आपल्याला ठरवता येतं, असं म्हणत असाल, तर तोदेखील भ्रमच.

लग्नाअगोदर जी परफेक्ट चॉइस वाटत असते, ती कालांतराने गळ्यातली धोंड वाटायला लागते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती भिन्न स्वभावाची असते.

तिने कसे वागावे हे तिच्या संस्कारांवर अवलंबून असते, ना की तुमच्या मतावर. आयुष्यात येईल त्या व्यक्तीचा, परिस्थितीचा आहे तसा स्वीकार केलात, तरचं तुम्हाला सुखाने जगता येईल.
रमेश वाघ   ९९२१८१६१८३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com