Wheat Verity : गोरेगावात गव्हाचा फुले समाधान वाण पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम

शेतकऱ्यांनी संवाद साधण्यासाठी त्रैमासिक महाबीज वार्ता हा डिजिटल मंच तसेच संकेतस्थळ उपलब्ध आहे.
Wheat Rate
Wheat RateAgrowon

Hingoli News : महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) (Mahabeej) तर्फे गोरेगाव (ता. सेनगाव) येथे गव्हाच्या फुले समाधान (Phule Samadhan Wheat Verity) या वाणाचा पीक प्रात्यक्षिक पाहणी (Crop Demonstration) कार्यक्रम बुधवारी (ता. २२) घेण्यात आला.

गोरेगाव (ता. सेनगाव) येथील शेतकरी दिगंबर नामदेवराव खिल्लारी यांच्या शेतावर आयोजित गहू पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमास ‘महाबीज’चे विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड, जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. सावरकर, तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषिविद्या विषय विशेषज्ञ राजेश भालेराव, तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुडे, मंडळ कृषी अधिकारी अशोक पिनाटे, कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर, भगवान पवार, कृषी सहायक अनिल खिलारी आदींची उपस्थिती होती.

Wheat Rate
Podcast TItle: सरकारच्या निर्णयावर गहू व्यापारी नाराज | Agrowon| ॲग्रोवन

कान्हेड म्हणाले, की शेतकऱ्यांनी संवाद साधण्यासाठी त्रैमासिक महाबीज वार्ता हा डिजिटल मंच तसेच संकेतस्थळ उपलब्ध आहे. उत्पादकता वाढीसाठी जैविक खतांचा वापर करावा. घोरपडे यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सावरकर म्हणाले, ‘गव्हाचा फुले समाधान हा वाण ११५ दिवस कालावधीचा, बागायती क्षेत्रासाठी योग्य आहे. हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक असून प्रतिहेक्टरी उत्पादकता ४५ त ५० क्विंटल आहे.

Wheat Rate
Wheat Harvest : गहू काढणीच्या कामांची पूर्व भागात लगबग

भालेराव म्हणाले, की उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक घरगुती निविष्ठा वापर करावा. कानवडे यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

सूत्रसंचालन विशाल शिंदे यांनी केले. गोरेगाव, जामठी, केंद्रा, माहेरखेडा, माझोड, गारखेडा, गुगुळपिंपरी, सवना, वरखेडा, कहाकर आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com