सव्वा तीन हजार हेक्टरवर भात रोपे लागवड

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर भात उत्पादक शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली आहे. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडत आहे.
Paddy
PaddyAgrowon

पुणे : भातपट्ट्यात (Paddy Belt) होत असलेल्या अधूनमधून पावसामुळे भात उत्पादकांमध्ये (Paddy Farmer) अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका (Paddy Nursery) टाकल्या आहेत. आतापर्यंत तीन हजार २२० हेक्टरवर रोपवाटिका तयार झाल्या आहेत. येत्या काळात चांगला पाऊस पडल्यास वेळेवर भात लागवड (Paddy Planting) होण्याची चिन्हे आहेत.

यंदा हवामान विभागाने (Weather Department) चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर भात उत्पादक शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली आहे. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडत आहे. खरीप हंगाम अडचणीत येत असताना पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. रोपवाटिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रोपवाटिका टाकल्यानंतर साधारणपणे २० ते २५ दिवसांत रोपे लागवडीसाठी येतात. त्या काळात पाऊस झाल्यास या भात रोपांचे मोठे नुकसान टाळून भात लागवडी वेळेवर होतील.

पुणे जिल्ह्यात एक ते वीस जून या कालावधीत अवघा ३५.१ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी भात रोपवाटिका टाकल्या आहेत. जिल्ह्यात भाताचे सरासरी ५७ हजार ९६४ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी एक जून रोजी भात पट्ट्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सुमारे चार हजार ३८२ हेक्टरवर भात रोपवाटिका झाल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाऊस पडल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्याने पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिला होता. यंदा जिल्ह्यात सुमारे ६१ हजार हेक्टरवर भात लागवडी होण्याचा अंदाज असल्याने मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत.

Paddy
भातरोपे वाळून जाण्याची भीती

मावळ तालुक्यातील भोयरे येथील रोहिदास लखिमले म्हणाले, की यंदा अडीच एकरांवर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खते, बियाणे गेल्या महिन्यात घेतले होते. दोन दिवसांपासून पावसास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भात लागवडीसाठी पाच ठिकाणी दीड ते दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका केली आहे. रोपे २३ ते २७ दिवसांच्या दरम्यान रोपे झाल्यानंतर लागवड करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय भात रोपवाटिकेचे क्षेत्र,

तालुका --- भात लागवडीचे क्षेत्र -- रोपवाटिकेचे क्षेत्र

भोर -- ७७५० -- ३६०

वेल्हे -- ५१०० -- २६०

मुळशी -- ७७०० -- ४१०

मावळ -- १२८०० -- ६३०

हवेली -- २२०० -- १२०

खेड -- ७३३० -- ५१३

आंबेगाव -- ५६०० -- ३००

जुन्नर -- ११००० -- ५५०

पुरंदर -- १५०० -- ८०

दौंड -- २० -- ०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com