Pm Kisan Samman Nidhi Yojana : ‘पीएम किसान’च्या ई-केवायसीला मुदतवाढ

४९ टक्के शेतकऱ्यांना दिलासा ः ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन
Pm Kisan Samman Nidhi Yojana
Pm Kisan Samman Nidhi YojanaAgrowon

वर्धा : पंतप्रधान किसान (Pm Kisan Samman Nidhi Yojana) सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचे वितरणासाठी ई-केवायसीला वाढीव मुदत देण्यात आल्याने ४९ टक्के शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले.

Pm Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता पीएम किसान पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत विशेष जनजागृती राबविण्यात आली होती. परंतु पीएम किसान पोर्टलवरील ई-केवायसी अहवालाच्या पाहणीत अत्यल्प प्रमाणात पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी केल्याते दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्त्याचे वितरण होणार नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावे. जेणेकरून केंद्र शासनाने वितरित करावयाच्या पुढील हप्त्याच्या वितरणाचा प्रश्न उद्भवणार नाही.

Pm Kisan Samman Nidhi Yojana
सातबारा, आठ ‘अ’च्या अधिकारासह पंतप्रधान किसान योजना ‘कृषी’कडे द्या 

४९ टक्के शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी
जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत लाभार्थी संख्या १ लाख ४६ हजार ३५६ आहे. त्यापैकी केवळ ७४ हजार ६६४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली तर ७१ हजार ६९२ लाभार्थींचे बँक खाते आधार संलग्न करणे बाकी आहे. ई-केवायसी पूर्ण करणाऱ्यांत ५१ टक्के तर न करणाऱ्यांत ४९ टक्के शेतकरी आहेत.
...........
१५ रुपयांत करता येणार ई-केवायसी
जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम निधी) संकेतस्थळ या टॅबमध्ये किंवा पीएम किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वत: ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येणार आहे. ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी १५ रुपये बायोमॅट्रिक प्रमाणिकरण दर निश्चित करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com