पोटखराब २४४ एकर जमीन येणार पिकाखाली

सातबारावर लागवडीलायक क्षेत्र वाढल्याने पीककर्ज (Agriculture Loan) इतर कर्जांच्या टप्यात वाढ झाली आहे. तसेच भूसंपादनाचा मोबदला हा पोटखराबानुसार न मिळता लागवडीसाठी योग्य असलेल्या दराप्रमाणे मिळणार आहे.
Maharashtra Farming
Maharashtra FarmingAgrowon

भोर, जि. पुणेः तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांचे २४४ एकर पोटखराब क्षेत्र लागवडीसाठी योग्य (वहीत योग्य) करण्यात आले असून या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.

राज्याच्या महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानात क्षेत्रीय स्तरावरून शेतकऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. यामुळे ११५ शेतकऱ्यांची पोटखराब क्षेत्राची जमीन ओलिताखाली आली असून त्याची नोंद सातबाऱ्यावर झालेली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लागवडीलायक क्षेत्र वाढून उत्पन्नात वाढ झाली आहे.

सातबारावर लागवडीलायक क्षेत्र वाढल्याने पीककर्ज (Agriculture Loan) इतर कर्जांच्या टप्यात वाढ झाली आहे. तसेच भूसंपादनाचा मोबदला हा पोटखराबानुसार न मिळता लागवडीसाठी योग्य असलेल्या दराप्रमाणे मिळणार आहे. याशिवाय शासनास मिळणाऱ्या जमीन महसूलामध्ये वाढ होणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यांत लागवडीसाठीच्या २४४ एकर क्षेत्राची नोंद सातबारावर झाली आहे. महसूल विभागाच्या तालुक्यातील भोर मंडलातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या ३६ प्रस्तावांना मान्यता दिली असून संगमनेर मंडलातील सर्वाधिक ७६.०५ एकर क्षेत्र लागवडीसाठी करण्यात आले आहे.

इतर मंडलातील शेतकरी प्रस्ताव व क्षेत्र पुढीलप्रमाणे कंसात प्रस्तावांची संख्या व क्षेत्र एकरांमध्ये - निगुडघर (३३, १९.३८ एकर) संगमनेर (२४, ७६.०६), भोलावडे (१६,७०.०९), आंबवडे (६, १२.३५) पोटखराब क्षेत्र लागवडीसाठी योग्य (वहीत योग्य) करण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी आपले पोटखराब क्षेत्र लागवडीखाली घेऊन आर्थिक परिस्थिती सुधारावी, असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले.

पोटखराब क्षेत्र लागवडीसाठी आणण्याची प्रक्रिया

- शेतकऱ्यांनी गाव कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज करणे

- मंडलाधिकारी यांच्यामार्फत विहीत नमुन्यातील अर्जाचा अहवाल तहलीसदारांकडे पाठविणे

- तहसीलदारांमार्फत अर्ज उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठविला जातो.

- भूमीअभिलेख आणि प्रांताधिकाऱ्यांकडून पोटखराब क्षेत्राचे लागवडीलायक क्षेत्रामध्ये रुपांतराचा आदेश पारित करून सातबारावर दुरुस्ती केली जाते.

पोटखराब क्षेत्र लागवडीसाठी आणण्याचे फायदे

- शेती उत्पन्नात वाढ

- भूसंपादनाचा मोबदला जास्त मिळणार आणि आपत्तीच्या वेळी जास्त नुकसानभरपाई मिळणार

- बँकांकडून पीककर्ज व इतर कर्ज मोठ्या प्रमाणात मिळणार

- जमिन विकासयोग्य होऊन शासनाच्या महसूलात वाढ होणार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com