Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

अतिवृष्टीमुळे तालुक्यात संग्रामपूर, सोनाळा महसूल मंडळासह इतर मंडळातही नुकसान झाले होते. याचे यंत्रणांकडून पंचनामे करण्यात आले.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः या वर्षात खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे (Heavy Rain) अतोनात नुकसान (Heavy rain in crop loss) झाले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामेसुद्धा करण्यात आले. त्याच्या याद्या तयार झाल्या.

दरम्यानच्या काळात मदतीची घोषणा (Farmer Help) झाली. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम माहिती ऑनलाइन अपडेट झाली नसल्याने संग्रामपूर तालुक्यातील २२ ते २३ गावांतील शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) २६ डिसेंबर २०२२ ला संग्रामपूर तहसील कार्यालयाला आदेश देत, दोन दिवसांत शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन ऑनलाइन करण्याचे निर्देश दिले होते.

परंतु, आता एक महिन्याचा कालावधी लोटला तरी या गावांतील शेतकऱ्यांची अंतिम माहिती सबमिट झालेली नाही.

अतिवृष्टीमुळे तालुक्यात संग्रामपूर, सोनाळा महसूल मंडळासह इतर मंडळातही नुकसान झाले होते. याचे यंत्रणांकडून पंचनामे करण्यात आले.

यानंतर अर्थसहायासाठी संपूर्ण माहितीसह अंतिम याद्या ऑनलाइन करणे गरजेचे होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात १०३ कोटींची मदतही जाहीर झाली आहे. ही अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी या प्रक्रीयेशिवाय पर्याय नाही.

शेतकऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन करण्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठ्यांना गावांचे वाटप करून देण्यात आले आहे. तालुक्यात ग्रामसेवकांकडे २२ ते २३ गावांची जबाबदारी होती.

तर उर्वरीत गावे कृषी सहायक व तलाठ्यांकडे देण्यात आली होती. ग्रामसेवकांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नैसर्गिक आपत्तीच्या कामांना सहकार्य न करण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

Heavy Rain
Crop Damage : अतिवृष्टी, सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत कधी मिळणार?

ग्रामसेवकांचा काम करण्यास नकार

बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय करण्यासाठी निधी वाटप करण्याचे समप्रमाणात आखून दिलेले काम महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना नाकारत असल्याचे लेखी निवेदन २८ डिसेंबर २०२२ रोजी तहसीलदारांना देण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची बाब ही महसूल विभागाशी निगडित आहे. परंतु ही जबाबदारी समप्रमाणात ग्रामसेवक संवर्गावर टाकण्यात आली.

ग्रामसेवकांकडे राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासह ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाचा व्याप आहे.

ग्रामसेवक संवर्गाची रिक्तपदे लक्षात घेता ही कामे ग्रामसेवकांकडून करून घेणे नैसर्गिक न्यायाला अनुसरून नाही, असे या संघटनेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानुसार ग्रामसेवकांकडील संबंधित गावांतील शेतकऱ्यांची संपूर्ण कागदपत्रे ऑनलाइन अपडेट केली नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com