राज्यात चांगल्या पावसाची शक्‍यता

महाराष्ट्रावर गुरुवार (ता.१६) हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतका कमी राहणे शक्‍य आहे. तसेच पुढील काही काळ हवेचा दाब तितकाच राहण्याची शक्यता आहे.
राज्यात चांगल्या पावसाची शक्‍यता
Rain UpdateAgrowon

महाराष्ट्रावर गुरुवार (ता.१६) हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतका कमी राहणे शक्‍य आहे. तसेच पुढील काही काळ हवेचा दाब (Air Pressure) तितकाच राहण्याची शक्यता आहे. आजपासून बुधवार (ता. १२ ते १५) पर्यंत हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका राहण्याची शक्‍यता आहे. या काळात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता (Rain Prediction) आहे. गुरुवार (ता.१६) पासून पावसात वाढ (Increase In Rain) होण्याची शक्यता आहे.

कोकण, पूर्व विदर्भासह कोल्हापूर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहून ती पावसासाठी अनुकूल राहील. सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. त्यातूनच मॉन्सून वारे वेगाने ढग वाहून आणतील आणि पावसाची शक्‍यता निर्माण करतील.

महाराष्ट्रात पेरणीसाठी वातावरण अनुकूल बनेल. हवामान बदलाच्या प्रभावाचा मॉन्सूनवर परिणाम होत असून पावसाचे वितरणही असमान आहे. जेथे हवेचे कमी दाब राहतील तेथे जोरात पाऊस होईल. मात्र हवेचे दाब अधिक असलेल्या ठिकाणी पावसाचे वितरण कमी प्रमाणात राहील. या आठवड्यात मॉन्सूनच्या चांगल्या पावसाची शक्‍यता आहे.

कोकण ः

आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०५ व ८२ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ६० व ९० मि.मी., रायगड जिल्ह्यात ४५ व ५५ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ३३ व २३ मि.मी., पालघर जिल्ह्यात २५ व १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १३ किमी राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. मात्र रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६३ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक व धुळे जिल्ह्यांत आज ६१ मि.मी. तर उद्या १२ ते १६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात आज १२ मि.मी. तर उद्या ११ ते १३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७४ टक्के, तर दुपारची ३२ ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १९ कि.मी. आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा ः

आज नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ७ ते १२ मि.मी., तर उद्या ४ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत २० ते २१ कि.मी. राहील. म्हणजेच या आठवड्यात मॉन्सूनच्या पावसास सुरुवात होईल. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमानात विविधता राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, परभणी जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस तर नांदेड, परभणी, जालना व हिंगोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३८ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

आज बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ६ ते १० मि.मी., तर उद्या १२ ते २३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची

दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २० ते २५ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३८ टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

आज यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात ८ ते १४ मि.मी, तर उद्या ६६ ते ९१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १९ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १९ टक्के राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील.

पूर्व विदर्भ ः

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज ७ ते १७ मि.मी., तर उद्या ५० ते ५४ मि.मी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३२ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः

कोल्हापूर जिल्ह्यात आज ९२ मि.मी. आणि उद्या ८२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सांगली, सातारा जिल्ह्यांत आज ३ ते ७ मि.मी., तर उद्या २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत आज ३० ते ३५ मि.मी. आणि उद्या १० ते १४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते २२ कि.मी. राहील. कमाल तापमान नगर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर पुणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५३ टक्के राहील.

कृषी सल्ला ः

- जमिनीत ६५ मि.मी. ओलावा निर्माण झाल्यानंतर सोयाबीन, मूग, मटकी, सूर्यफूल, भुईमूग, चवळी, उडीद, तूर, बाजरी, खरीप ज्वारी या पिकांच्या पेरण्या कराव्यात.

- धूळवाफ पेरणी करू नये.

- चांगला पाऊस सुरू झाल्यानंतर फळझाडांची लागवड करावी.

- आडसाली ऊस लागवडीसाठी जमीन तयार करावी.

- हळद, आले, सुरण यां पिकांच्या लागवडीची कामे पूर्ण करावीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com