Kharif Season : खरीप हंगामपूर्व शेतकरी सभेचे जुमडा येथे आयोजन

Kharif Season Update : वाशीम जिल्ह्यातील जुमडा येथे कृषी विभागाच्या पुढाकाराने शनिवारी (ता.२०) खरीप हंगामपूर्व शेतकरी सभा घेण्यात आली.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Washim News : वाशीम जिल्ह्यातील जुमडा येथे कृषी विभागाच्या पुढाकाराने शनिवारी (ता.२०) खरीप हंगामपूर्व शेतकरी सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप शिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपसरपंच गंगाधर पडघान, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीराम शिंदे, कृषी पर्यवेक्षक एस. बी. वाळूकर, जिल्हा प्रतिनिधी गोपाल अंभोरे, कृषी सहायक श्री, काळबांडे, भागवत देशमुख, दत्ता शिंदे, मदन शिंदे, महादेव सोळंके उपस्थित होते.

सोयाबीन उत्पादन वाढीसाठी अष्टसूत्रीबाबत श्री. तोटावार यांनी माहिती दिली. सोयाबीन बियाणे हे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी प्रमाणित बियाणे वापरण्याची गरज नाही. मागील सोयाबीन हंगामात जे घरगुती बियाणे साठवून ठेवले आहे. त्याची स्पायरलच्या साह्याने प्रतवारी करून बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करावी.

त्यामुळे आपले बियाणे पेरणी योग्य आहे की अयोग्य आहे हे कळेल. ७० टक्के उगवण क्षमता असलेले बियाणे आपण पेरणीसाठी ठेवावे तसेच बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Kharif Season
Kharip Meeting: बाळासाहेब थोरातांनी खरीप हंगाम आढवा बैठक

सोयाबीन पेरणी करताना पाच सेंटीमीटरपेक्षा बियाणे खोल टाकू नये. पेरणी करताना शक्यतो बीबीएफ यंत्राद्वारे टोकण किंवा बेडवर लागवड केल्यास झाडाची संख्या प्रतिहेक्टरी योग्य प्रमाणात राहते. त्यामुळे सूर्यप्रकाश, हवा खेळती राहून फांद्याची संख्या वाढते.

फूल व फळधारणा अधिक होऊन उत्पादनात वाढ होते. एकरी बियाण्याचे प्रमाण हे सर्वसाधारण पेरणी यंत्रासाठी एकरी २६ किलो वापरावे व तसेच बीबीएफसाठी २० ते २२ किलो, सरीवर वरंब्यावर टोकण यंत्रासाठी १४ ते १६ किलो बियाणे वापरावे.

तसेच शिफारशीप्रमाणे प्रतिएकरी १२ किलो नत्र, ३० किलो स्फुरद व १२ किलो पालाश रासायनिक खत द्यावे. तसेच संयुक्त खते देताना एकरी आठ किलो सल्फर द्यावे. त्यामुळे सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण व दाण्याचा आकार मोठा होऊन उत्पादनात वाढ होते. श्री. सोळंके यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे होणारे फायदे व बीबीएफचे महत्त्व स्पष्ट केले.

एम. टी. शिंदे यांनी मागील वर्षी गोभणी गावामध्ये खरीप हंगामामध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. श्री. अंभोरे यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत देशमुख यांनी केले. एम. टी. शिंदे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com