भोकर तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा केळीला तडाखा

अर्धापूर तालुक्यातील बामणी शिवारात बुधवारी रात्री काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा फटका शेतीला बसला.
भोकर तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा
केळीला तडाखा
Pre-Monsoon RainAgrowon

नांदेड : जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) झालेल्या मॉन्सूनपूर्व (Pre-Monsoon Rain) वादळी पावसामुळे (Rain) अर्धापूर तालुक्यातील बामणी शिवारात केळीच्या बागा (Banana Crop) आडव्या पडल्या आहेत. गुरुवारीही पावसाने हजेरी लावली. हा पाऊस भोकर मंडळात ३१ मिलिमीटर झाल्याने शेतात पाणी साचले होते.

अर्धापूर तालुक्यातील बामणी शिवारात बुधवारी रात्री काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा फटका शेतीला बसला. कमी-अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्या आहेत. तालुक्यातील बामणी शिवारात संतोष बडायल्या, अशोक देलमडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागाला फटका बसला. काही ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. पंधरा दिवसांवर काढणीस आलेल्या केळीची झाडे पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com