राज्यात उद्यापासून वादळी पावसाची शक्यता

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान; उकाडाही वाढला
राज्यात उद्यापासून वादळी पावसाची शक्यता
Monsoon UpdateAgrowon

पुणे : मॉन्सूनचे आगमन (Monsoon Arrival) काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाला (Pre Season Rain) पोषक हवामान होत आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. उकाडाही (Heat) वाढला आहे. उद्यापासून (ता. ३०) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही कमाल तापमानात घट होत आहे. कोकणात कमाल तापमान ३३ ते ३७ अंश, मध्य महाराष्ट्रात २८ ते ४२ अंश, मराठवाड्यात ३७ ते ४०, तर विदर्भात ३८ ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे.

ओडिशा आणि परिसरावर, तसेच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहेत. पंजाबपासून, उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उद्यापासून (ता. ३०) राज्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३५.१, धुळे ४०.०, जळगाव ४०.०, कोल्हापूर ३२.९, महाबळेश्वर २८.२, नाशिक ३४.७, निफाड ३५.५, सांगली ३५.४, सातारा ३४.६, सोलापूर ३८.०, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ३३.५, परभणी ४०.२, नांदेड ३९.४, अकोला ४१.९, अमरावती ४०.४, बुलडाणा ३८.८, ब्रह्मपुरी ४१.०, चंद्रपूर ४३.०, गोंदिया ४०.२, नागपूर ४२.६, वर्धा ४२.४, यवतमाळ ४०.५.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान ः

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीस पोषक हवामान आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २७) मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटांच्या काही भाग, कोमोरिन समुद्राचा आणखी काही भाग, श्रीलंका देशाचा निम्मा भाग, बंगालच्या उपसागरात प्रगती केली. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा शनिवारी कायम होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com