Kharif Season : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाची कृषी विभागाकडून तयारी

Fertilizer Demand : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणे आणि खतांची मागणी कृषी विभागाने केली आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Kharif Season Update In Sangli : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणे आणि खतांची मागणी कृषी विभागाने केली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून खते आणि बियाणे कमी पडणार याची काळजी कृषी विभागाने घेतली आहे.

एक लाख टन खते आणि ३८ हजार क्विंटल बियांची मागणी केली आहे. जिल्ह्यात एकरा भरारी पथकांनी नियुक्ती केली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील ६७७ गावात सुमारे ३ लाख ५६ हजार ३२८ हेक्टर इतके खरिपाचे क्षेत्र आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी युरिया ५२ हजार १०० टन , डीएपी २० हजार ८९१ टन, एम. ओ. पी. २१ हजार १७५ टन, एस.एस.पी. ३० हजार २८६ टन आणि संयुक्त खते ६४ हजार ९०२ टन असे एकूण १ लाख ८९ हजार ३५४ टन खतांची मागणी केली आहे.

खरिपासाठी भात ६ हजार ७३२ क्विंटल, ज्वारी, ५ हजार ६६५ क्विंटल, बाजरी ३ हजार २० क्विंटल, तूर ६२१, मूग २४७, उदीड ८५१, भुईमूग, १ हजार ४६८, सूर्यफूल, १२९ सोयाबीन १३ हजार ५८६, आणि मका ६ हजार ६९८ क्विंटल असे एकूण ३८ हजार १७ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.

Kharif Season
Kharif Season : खरीप हंगामात सोयाबीन लागवडीकडे कल

जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे सोयाबीनसन अन्य पिकांचे बियाण्यांची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन केले आहे. बनावट खते, आणि अप्रमाणित बियाणे विक्री होवू नये यासाठी कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे.

त्यानुसार जिल्ह्यात अकरा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांना कृषी सेवा केंद्राची तपासणी करून दिले असून अप्रमाणित बियाणे, बोगस खते, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील आत्तापर्यंत अडीच हजार बियाणे वितरकांची, तीन हजारांवर खत वितरकांची २७०० हून अधिक कीटकशाक विक्रेत्यांची तपासणी केली आहे.

खरीप हंगामात बोगस खते, बियाणे विक्री करण्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच खते आणि बियाणांची कमतरता पडू दिली जाणार नाही.
विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com