Shahada Apmc Election : शहादा बाजार समिती निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी पदाधिकारी ठाम

बाजार समितीच्या निवडणुकीत कोण कोणत्या राजकीय पक्षात आहे यापेक्षा व्यक्ती केंद्रित निवडणुकीला जास्त महत्त्व असल्याचे सूर उमटत आहेत.
Shahada Apmc Election
Shahada Apmc ElectionAgrowon

Nandurbar News : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (Shahada Agriculture Produce Market Committee Election) सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील या दोन्ही नेत्यांनी आपापल्या गटाचा स्वतंत्र बैठका घेऊन निवडणुकीबाबत पदाधिकारी व संबंधित मतदारांशी चर्चा घडवून आणली.

आता पाटीलद्वयी निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटांत समेट होतो की निवडणुकीचा रणसंग्राम होतो, हे लवकरच समजेल. मात्र पदाधिकारी निवडणुकीवर ठाम आहेत.

पदाधिकारी निवडणुकीवर ठाम

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १८ जागांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीची निवडणूक झाली नाही. बिनविरोध होत आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक होते.

मात्र यंदा निवडणुकीची चर्चा होत आहे. विनिमय बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पॅनेल उभे करून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. मात्र सत्ताधारी व विरोधी गट काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

तीन एप्रिलपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत आहे, त्यामध्ये सुट्ट्या आल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी अल्पकाळ उपलब्ध होणार आहे.

Shahada Apmc Election
APMC Election : सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिका गुलदस्‍त्यात!

...असे आहेत मतदार

येथील बाजार समिती जिल्ह्यात अग्रगण्य आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघात ११ जागा असून, ९८४ मतदार आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघात चार जागा १३९० मतदार, व्यापारी मतदार संघाच्या दोन जागा २५० मतदार, तर हमाल मतदार संघात एक जागा २११ मतदार मतदानाच्या हक्क बजावतील.

पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित निवडणूक

दरम्यान, येथील बाजार समितीच्या निवडणुकीत कोण कोणत्या राजकीय पक्षात आहे यापेक्षा व्यक्ती केंद्रित निवडणुकीला जास्त महत्त्व असल्याचे सूर उमटत आहेत.

तालुक्याच्या राजकारणात सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील गटाचे व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील गटाचे राजकीय सौख्य सर्वश्रुत आहे.

आजपर्यंत अनेक सहकार तत्त्वावरील व अन्य निवडणुकांमध्ये दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी निवडणुका लढवल्या गेल्या. त्यात यश अपयश आले.

सध्या तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत परस्परविरोधी पॅनल उभे ठाकल्यास कोण कोणत्या पक्षात आहे, यापेक्षा कोणत्या व्यक्तीचे पॅनेल कोणते याला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com