Pomegranate Orchard : डाळिंबाचा नवीन बहार धरण्यासाठी पूर्व तयारी वेगात

डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले तर छाटणी मजूर पूर्वी एवढेच आहेत. मजूर जास्त असल्यामुळे छाटणीची कामे संपत आलीत.
pomegranate
pomegranateAgrowon

Snagli News : डाळिंब बहाराची (Pomegranate spring) सांगता झाल्याने नवीन बहार धरण्याच्या पूर्वतयारीच्या बागाची छाटणी, चाचरणे, शेणखते घालने आणि अंतर्गत मशागत अशी हंगाम पूर्व तयारीच्या कामानी वेग घेतला आहे.

आटपाडी तालुक्याची निर्यातक्षम आणि दर्जेदार डाळिंब उत्पादन (Pomegranate production) करणारा तालुका ओळख आहे. तालुक्यात बारा ते पंधरा हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र होते.

मात्र गत दोन ते तीन वर्षांत झालेल्या जास्त पावसामुळे मर आणि पिन बोर रोगामुळे सात ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील बागा पूर्ण वाळून गेल्या. या वाळलेल्या बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या आहेत. रोगामुळे तालुक्यातील डाळिंबाचे क्षेत्र घटले असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात नवीन लागवड सुरू आहे; मात्र ती अपेक्षित प्रमाणात नाही. नवीन लागवड केलेल्या बागांना हंगाम धरण्यासाठी अजून बराच अवधी आहे.

pomegranate
पावसाचा डाळींब पिकाला तडाखा

मर आणि पिन बोर रोगाच्या तडाख्यातून वाचलेल्या पाच ते सात हजार हेक्टर क्षेत्रातील डाळिंबाच्या बहाराची (हंगाम) सांगता एक ते दीड महिन्यापूर्वीच झाली आहे. तालुक्यातील बहुतांश डाळिंब बागा पूर्ण मोकळ्या झाल्या आहेत.

ज्या बागा मोकळ्या झाल्या आहेत. त्या बागाचा पुढचा बहार धरण्याच्या दृष्टिने पूर्व तयारीची कामे शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यापासून सुरू केली आहेत. या बागांची हंगाम पूर्व हलकी छाटणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

या छाटणीत झाडातील अतिरिक्त आणि वाळलेल्या फांद्या काढण्याबरोबरच वॉटरशूट काढल्या जातात. छाटणी करून बागा चाचरून शेण आणि वर खताचा डोस देऊन झाडात स्टोरेज करण्यासाठी पाणी चालू केले जाते.

अनेकाची छाटणी पूर्ण झाली आहे तर काहींनी खते घातली आहेत तर काहीची कामे पूर्ण होऊन पाणी चालू केले आहे. हंगाम धरण्याच्या पूर्वतयारीची कामे अंतिम टप्प्यात आली असून कामांनी वेग घेतला आहे.

pomegranate
डाळिंबाचा मृग बहार बहरू लागला

बागा कमी मजूर आणि शेणखत मुबलक

डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले तर छाटणी मजूर पूर्वी एवढेच आहेत. मजूर जास्त असल्यामुळे छाटणीची कामे संपत आलीत. मजूरानाच छाटणीची कामे शोधावी लागत आहेत. त्यामुळे काहींनी मजुरीचे दरही कमी केलेत. अशीच परिस्थिती शेणखता बाबत झाली आहे.

दुसऱ्या जिल्हा आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शेणखत येत होते. तरीही ते कमी पडायचे मात्र बागाच कमी झाल्यामुळे शेणखताची मागणी कमी झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com