Krushik Exhibition 2023 : बारामतीच्या कृषी प्रदर्शनात जामखेडच्या ज्वारीचे सादरीकरण

सीनामाई शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आणि ‘नाबार्ड’च्या माध्यमातून अक्षयने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.
Agricultural Exhibition
Agricultural ExhibitionAgrowon

संतराम सूळ

जामखेड, जि. नगर ः वैशिष्ट्यपूर्ण असलेली जामखेडची ज्वारी (Jamkhed Jowar) बारामती येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनात (Krushik Agricultural Exhibition Baramati) नेऊन, या ज्वारीच ब्रॅण्डिंग करण्याचा प्रयत्न जामखेड तालुक्यातील जवळा येथील अक्षय वाळुंजकर या युवकाने केला.

अभियंता असलेल्या अक्षय याने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात (KVK Baramati) भरलेल्या राज्यव्यापी कृषी प्रदर्शनात भरडधान्य विभागात ‘जामखेडची ज्वारी’ या नावाने ज्वारी विक्रीसाठी स्टॉल उभा करून, या ज्वारीचे वैशिष्ट्य लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला.

सीनामाई शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आणि ‘नाबार्ड’च्या माध्यमातून अक्षयने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

आपल्या रोजच्या जेवणात ज्वारीचे अन्यन साधारण महत्त्व असतानाच, वैशिष्ट्यपूर्ण असलेली जामखेडची ज्वारी देशभर प्रसिद्ध आहे.

ती दर्जेदार दाणा आणि खायला रूचकर असलेल्या वैशिष्ट्यांमुळे. जामखेड तसा कोरडवाहू तालुका. त्यामुळे ज्वारीचे पीक पावसावरच घेतले जाते.

त्यातच या भागात ज्वारीचे परंपरागत स्थानिक वाण शेतकऱ्यांनी जपले आहेत. त्यामध्ये मालदांडी, ज्यूट, बेद्र, दगडी या जातीच्या वाणांची पेरणी बहुतांश शेतकरी करताना दिसतात.

अशा ज्वारीला या भागात वातावरण पोषक असल्याने, अतिरिक्त खताची गरज भासत नाही. या ज्वारीचा कडबा पशुखाद्य म्हणून जनावरांना दर्जेदार म्हणून समजला जातो.

दरम्यान, अलिकडच्या काळात फुले यशोधा, वसुधा, माऊली, चित्रा, सिलेक्शन-३ , सुचित्रा, रेवती, परभणी मोती, ज्योती, सुपर मोती असे अनेक ज्वारीचे वाण निघाले. मात्र परंपरागत वाण जपत जामखेडच्या ज्वारीने आपले वैशिष्ट्य जपले आहे.

Agricultural Exhibition
Podcast TItle: केंद्र सरकार ज्वारी, बाजरी, मक्याची खरेदी वाढवणार | Agrowon
ज्वारीचा उत्पादन खर्च जास्त आहे. कारण ज्वारी यांत्रिकीकरणाने काढता येत नाही. तर ती माणसांच्या मदतीनेच काढावी लागते. त्यातच ज्वारीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत जामखेडच्या ज्वारीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वारीला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा आहे.
अक्षय वाळुंजकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com