Fish Rate : सुक्‍या मासळीचे दर गगनाला

Fisheries : पावसाळा काही दिवसांवर आला असून दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे.
Fish Rate
Fish RateAgrowon

Fisheries Update In Mumbai : पावसाळा काही दिवसांवर आला असून दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे. हंगामाचा शेवट चांगला करण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. मात्र पकडलेली मासळी बाजारात न विकता, सुकवून विकण्याकडे मच्छीमारांचा कल वाढत आहे.

पावसाळ्यासाठी अनेक गृहिणींकडून बेगमी करून ठेवण्यात येत असल्‍याने सुक्‍या मासळीची मागणी वाढल्‍याने दरही गगनाला भिडले आहेत.

कोळीवाड्यात मासळी सुकवण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे रस्त्यांवर बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकूल आणि करंदी या मासे सुकवण्यासाठी ठेवले आहेत.

वातावरणातील बदलांमुळे खोल समुद्रातील मासेमारीवरही परिणाम झाल्याने मच्छीमारांनी मासळी सुकवण्यास प्राधान्य दिले आहे. पावसाळ्यातील बेगमीसाठी सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.

Fish Rate
Fish Market Rate Increase : सुक्या मासळीचे भाव वधारले

रायगडमधील आक्षी, वरसोली, जीवनाबंदर, राजपुरी कोळीवाड्यातून दररोज काही टनांमध्ये सुकी मासळी राज्यातील इतर भागात पाठवली जाते. त्‍यामुळे स्थानिक बाजारात सुक्या मासळीचे दर वाढले आहेत.

सुटीसाठी कोकणात आलेले चाकरमानी सुक्या मासळीची बेगमी जमा करीत आहेत, मात्र वाढलेल्या किमतीमुळे खिशाला कात्री लागत आहे.

नियमानुसार १ जूनपासून मासेमारी बंद होते. पावसाळ्यापूर्वी समुद्राला उधाण येत असल्याने नुकसान टाळण्यासाठी मच्छीमार खोल समुद्रात जाणे टाळतात. सध्या समुद्रातील पाण्याचा प्रवाह वेगाने बदलत आहे. जाळी तुटणे, नौका नियंत्रणात न राहणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे २५ मेपासूनच मच्छीमार बंदरात येण्यास सुरुवात करतील. मासेमारीचा हा शेवटचा फेरा आहे.
मच्छिंद्र गिदी, मच्छीमार, राजपुरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com