Fish Market Rate Increase : सुक्या मासळीचे भाव वधारले

Fish Demand : मासेमारीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असल्यामुळे सध्या सुक्या मासळीला अधिक मागणी आहे.
Fish Rate
Fish RateAgrowon

Mumbai Fishing Season Update : मासेमारीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असल्यामुळे सध्या सुक्या मासळीला अधिक मागणी आहे. पावसाळ्यातील बेगमीसाठी घरोघरी सुकी मासळीची साठवण केली जाते. पण मागणी वाढल्याने सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.

पावसाळ्यातील बेगमीसाठी ओल्या मासळीबरोबर सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. राज्यभरातून सुक्या मासळीला मागणी असते. त्यामुळे मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर आत्तापासूनच मासळी सुकवण्याची लगबग पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई शहरात सुक्या मासळीचे होलसेल मार्केट जरी नसले तरी वाशी , दिवाळे, घणसोली, दिवा याठिकाणी खाडी किनाऱ्यांवर मासळी सुकवण्याचे काम सध्या सुरू आहे.

अशातच सध्या कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे रस्त्यांवर बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकूल आणि आंबाड या मासे सुकवण्यासाठी ठेवण्यात येत आहे. तसेच वातावरणातील बदलांमुळे खोल समुद्रातील मासेमारीवरही परिणाम झाल्याने मच्छीमारांनी मासळी सुकवण्यास प्राधान्य दिले आहे.

Fish Rate
Decrease In Fish : मुरूड तालुक्यात मासळीत घट

नवी मुंबईत सुक्या मासळीचे बाजार नसल्याने किरकोळ बाजारात मिळणाऱ्या सुक्या मासळीची चढ्या दराने विक्री होते. यामध्ये बोंबील, वाकटी, आंबडा, सोडे, ढोमी, बांगडा, कोलीम आदींचा समावेश होतो.

पावसाळ्यातील चार महिन्यांत खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्याने सुक्या माश्यांच्या विक्रीतून मच्छीमारांना दोन पैसे मिळवता येतात. अशातच वाढत्या महागाईमुळे सुक्या मासळीचे दर हे गतवर्षाच्या तुलनेत अधिक वाढले असून मासे वाळविण्यासह खारवणे ही प्रक्रिया देखील परवडणारी राहिली नसल्याने दर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

ग्राहकांसाठी ऑनलाइन खरेदीचा पर्याय

नवी मुंबईतील खवय्ये अगोटीसाठी शिवडी,पनवेल, तळोजा, भिवंडी, खारबाव, वसई, गडप आदी ठिकाणी असणाऱ्या सुक्या मासळीच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर सध्या ऑनलाईन सुक्या मासळीच्या ऑर्डर घेऊन घरपोच मासळी पोहोचवली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com