विकास आणि वारसा दोन्ही महत्त्वाचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी : संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे उद्‌घाटन
विकास आणि वारसा दोन्ही महत्त्वाचे
Narendra Modiagrowon

पुणे : ‘‘संत तुकाराम महाराज यांचे शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे, तर सांस्कृतिक भविष्य घडवणारं मंदिर आहे. राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी प्राचीन ओळख आणि परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणूनच, आज जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा हे भारताच्या विकासाचे समानार्थी शब्द बनत आहेत, तेव्हा विकास आणि वारसा दोन्ही हातात हात घालून चालतील याची मी खात्री देतो,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी केले.

देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं उद्‌घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१४) करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ह.भ.प. मारुती बुवा महाराज कुरेकर, देहू देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान आणि पंढरपुरच्या संत विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले,‘‘संतांचा सहवास लाभला की ईश्वराचं दर्शन आपोआप होतं. देहूच्या पवित्र भूमीत आल्याचं मला सौभाग्य लाभलं त्यामुळं मी देखील याची अनुभूती घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या शिलान्यासाची संधी मिळाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची सुरुवात पाच टप्प्यात होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम ३ टप्प्यात पूर्ण होईल.’’

या वेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे भाषण झाले. देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी देवस्थानच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे तुकाराम पगडी, चिपळ्या आणि तुळशीचा हार घालून स्वागत करण्यात आले.


संत तुकाराम आणि शिवराय...
‘‘संत तुकारामांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते आणि काळाबरोबर संबंधित असते, ते अखंड असते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे,’’ असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com