
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आईचे हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांचे शुक्रवारी (ता.३०) पहाटे ३:३० वाजता निधन झाले. आईच्या निधनासंबंधीचे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी माहिती दिली. हिराबेन मोदी यांच्यावर अहमदाबाद येथील युएन मेहता हॉस्पिटलमध्ये (UN Mehata) उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. हिराबेन मोदी यांनी १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
दोन दिवसांपासून हिराबेन यांच्यावर उपचार सुरू होते. आईची प्रकृती बिघडत असल्याने नरेंद्र मोदींनी आईची अहमदाबाद येथे जाऊन भेट घेतली होती. मात्र पहाटे ३.३० त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्र आणि राज्यातील अनेक नेत्यांनी हिराबेन यांना श्रद्धांजली वाहली.
कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी हिराबेन यांच्या निधनाबद्दल दु;ख व्यक्त केले. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हणाले, "पंतप्रधानांच्या आई हिराबा यांच्या निधनाची बातमी दु:खद आहे. या कठीण प्रसंगी मी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सदस्या प्रति सहवेदना आणि स्नेह व्यक्त करतो."
खर्गे ट्विटमध्ये म्हणाले, "श्रीमती हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. श्री. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. या दुखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत."
शुक्रवारी (ता.३०) सकाळी गांधीनगर येथील स्मशानभूमीत हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.