
Pandharpur News : चैत्र शुद्ध एकादशी दोन एप्रिल २०२३ ला असून, यात्रेनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी (Vitthal- Rukmini Temple) दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. चैत्री यात्रा उन्हाळ्याच्या दिवसांत असल्याने अन्न पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रशासनाने हॉटेल, उपवासाचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके नेमून मोहीम राबवावी, या कालावधीत भाविकांची आरोग्य सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य द्या, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
चैत्री यात्रा नियोजनाबाबत पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस तहसीलदार सुशील बेल्हेकर, अप्पर तहसीलदार समाधान घुटुकडे, बीडीओ प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलिस निरीक्षक अरुण फुगे, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हणाले, की पंढरपुरात चैत्री यात्रा कालावधीत तीन ते चार लाख भाविक येतात. या यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
सर्व मठांमध्ये बनविण्यात येणाऱ्या अन्न पदार्थाची तपासणी करावी व अन्न शिजवतना कोणती काळजी घ्यावी, याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात. असेही श्री. गुरव यांनी म्हणाले.
दर्शनरांगेतील वारकऱ्यांना खिचडी, लिंबू सरबत
चैत्री यात्रा कालावधीत पत्राशेड, दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदिर परिसर येथील स्वच्छता मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी ४०० स्वयंसेवक व मंदिर समितीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणेक करण्यात आली आहे.
दर्शनरांगेतील भाविकांना दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी खिचडी, लिंबू सरबत, ताक किंवा मठ्ठा मोफत वाटप करण्यात येणार आहे, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.