Maharashtra Politics : महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न वाढले अन् सरकार राजकारणात व्यस्त

महाविकास आघाडीची एकजूट कायम असून महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सोबत असून, सोबतच राहणार आहोत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon

Pune News : ‘‘सध्या सर्वसामान्य जनता महागाई (Mahagai) , बेरोजगारीशी लढत आहे. स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी वाढला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, अशी सर्व परिस्थिती असताना सरकार मात्र राजकारणात व्यस्त आहे, हे योग्य नाही,’’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली. भोर तालुक्यातील विविध गावांच्या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.

खोपी (ता. भोर) येथील जोडरस्ता (३५ लाख), समाजमंदिर (८ लाख) व बंदिस्त गटार (३ लाख), तसेच ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे भूमिपूजन (१५ लाख), वरवे बुद्रुक येथील नवीन पाणी योजनेचे भूमिपूजन (१ कोटी २६ लाख) व कामथडी येथील नवीन पाणी योजनेचे उद्‍घाटन (१ कोटी ७८ लाख) व नवीन बसथांबा आदी विकासकामाचे भूमिपूजन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Maharashtra Politics
Cotton Market Rate : शेतकऱ्यांवर महागाई, कमी दरांचे संकट

या वेळी जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा नियोजनाचे माजी सदस्य विक्रम खुटवड, माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे, शलाका कोंडे, माजी पंचायत समिती सदस्या पुनम पांगारे, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, रवी बांदल, प्रकाश तनपुरे, स्वप्नील कोंडे, काका शिळीमकर, गणेश धुमाळ, गणेश खुटवड, कामथडीच्या सरपंच पल्लवी मांढरे, उपसरपंच नितीन इंगुळकर, सोसायटी अध्यक्ष संपत वाल्हेकर, माजी सरपंच शरद मांढरे, बाळासाहेब वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘महाविकास आघाडीची एकजूट कायम असून महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सोबत असून, सोबतच राहणार आहोत. दिल्लीचे लोक महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष संपविण्याचे कट कारस्थान करीत आहेत,’’ अशी खंत व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com