Processing Training : नंदुरबारच्या शेतकऱ्यांना प्रक्रियाविषयक प्रशिक्षण

जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले.
Processing Training
Processing TrainingAgrowon

Nandurbar News : कृषी विभागातर्फे (Agricultural Department) जागतिक बँकेच्या साह्याने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लुधियाना (पंजाब) येथील सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ पोस्ट हारवेस्ट इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी (सिफेट) येथे कृषी प्रक्रियाबाबत प्रशिक्षण (Agricultural Process Training) देण्यात आले.

स्मार्ट योजनेतून पिकांच्या मूल्यसाखळी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले. नऊ दिवस तेथे शेतकरी उपस्थित होते. त्यात शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया व इतर बाबींची माहिती घेतली.

Processing Training
Farmer Training : देवरी येथे शेतकरी गट संघटन, कौशल्य विकास प्रशिक्षण

‘सिफेट’ ही केंद्र शासनाच्या भारतीय कृषी अनुसंधान संस्थेची कृषी प्रक्रिया व अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन व विस्तार कार्य करणारी सर्वोच्च संस्था आहे.

या संस्थेत आंतरराष्ट्रीय तसेच देशभरातील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी यांना अन्न व कृषीमाल प्रक्रिया या विषयावर संशोधन व प्रशिक्षण विषयक ज्ञान दिले जाते.

शेतकऱ्यांना शेतीमाल वाळवणे, अन्नधान्य पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक, अन्नप्रक्रिया उद्योगाची (fssai) मानके, शीतसाखळी तसेच अन्नधान्य भरडधान्य फळे व भाजीपाला यांचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थनिर्मिती (उदा. पावडर, सॉस, केचप, सोया मिल्क, सोया पनीर इ.) करणे यांसारख्या विषयांवर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

कृषी प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक विकसित विविध आधुनिक प्रकारची यंत्रे, अवजारे व तंत्रज्ञान यांची प्रात्यक्षिकासह माहितीही देण्यात आली.

‘सिफेट’च्या प्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अरमान मुजादादी व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. यादव यांनी तेथे संयोजन केले.

नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असून मोठ्या प्रमाणात भरडधान्य पिके पारंपरिक पद्धतीने घेतली जातात.

Processing Training
Orange Crop Management : बेलखेडा येथे संत्राफळ पीक, मृग बहर व्यवस्थापनावर प्रशिक्षण

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पौष्टिक तृणधान्य पिकांचे प्रक्रियायुक्त पदार्थनिर्मिती करून उद्योजक व्हावे व आपला एक ब्रँड विकसित करून नावारूपास आणावा, असे आवाहन ‘सिफेट’चे संचालक डॉ. नचिकेत कोतवालवाले यांनी केले.

स्मार्ट प्रकल्पाचे नंदुरबार जिल्हा नोडल अधिकारी प्रदीप लाटे व मूल्य-साखळी तज्ज्ञ उमाकांत पाटील यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.

नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक नीलेश भागेश्वर यांनी मार्गदर्शन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com