Chana Procurement in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर १३ हजार क्विंटल हरभरा खरेदी

शेतकऱ्‍यांची अडचण पाहता हरभरा नोंदणीला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
Harbhara Market
Harbhara MarketAgrowon

Yavatmal News : ‘नाफेड’च्या (Nafed) हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदीला (Msp Chana Procurement Center) सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल सात कोटी रुपयांच्या हरभऱ्‍यांची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात अकरा हजार शेतकऱ्‍यांनी नोंदणी केली असून त्यातील केवळ ७४० शेतकऱ्‍यांनी हरभरा विकला आहे.

खासगी बाजारात हरभऱ्‍याचे दर खाली आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. शासनाने ‘नाफेड’चे हमीभाव केंद्रे जाहीर केली.

या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन शासनाने केले. खासगी बाजारात हरभऱ्‍यांचे दर पडल्याने शेतकऱ्‍यांनी हमीभाव केंद्राला पसंती दिली आहे. शेतकऱ्‍यांनी यावेळी ‘नाफेड’च्या नोंदणीला चांगला प्रतिसाद असून अकरा हजार शेतकऱ्‍यांची नोंदणी झाली आहे.

Harbhara Market
Chana Procurement : हरभरा खरेदी नोंदणीमध्ये ऑनलाइन पेऱ्याची अडचण

शेतकऱ्‍यांची अडचण पाहता हरभरा नोंदणीला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ‘नाफेड’ने १४ मार्चपासून खरेदीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्‍यांचा प्रतिसाद पाहता यंदा ‘नाफेड’ला मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागण्याची शक्यता होती. तसे दिसून येत आहे.

गेल्या आठ दिवसांत सात केंद्रावर १३ हजार ६१५ क्विंटल हरभऱ्‍यांची विक्री शेतकऱ्‍यांनी केली आहे. बाजार भावानुसार ही खरेदी सात कोटी २६ लाख ३९ हजार ७०६ रुपयांची आहे.

आतापर्यंत ७४० शेतकऱ्‍यांनी हरभरा विक्री केली आहे. अजूनही दहा हजार शेतकरी शिल्लक आहे. खासगी बाजारात हरभऱ्‍यांचे दर सातत्याने खाली येत आहे. दरवाढतील याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी हमीभावदरात विक्री करीत आहे.

अजूनही हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्‍यांची नोंदणी सुरूच आहे. काही तालुक्यात नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. नोंदणी तसेच खरेदीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Harbhara Market
Chana Procurement : हमीभाव केंद्रावरील रांगेमधील वाहनातील हरभरा पिशव्यांची चोरी

केंद्र-झालेले खरेदी (क्विंटलमध्ये)

महागाव - १२५४

पांढरकवडा - ८४१

दिग्रस - ७५५

बाभूळगाव - १०२२

आर्णी - १८७६

पुसद - ६६९२

पाटण - ११७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com