प्रकल्पग्रस्तांनी पाडले देहली प्रकल्पाचे काम बंद

पावसाळ्यापूर्वी काम होणे आवश्‍यक
Dehli Project
Dehli ProjectAgrowon

अक्कलकुवा, जि.नंदुरबार ः गेल्या ४० वर्षा पासून रखडलेल्या देहली प्रकल्पाचे (Dehli Project) जानेवारी महिन्यात सुरु झालेले घड भरणीचे अंतिम टप्प्यातील काम हे पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी (Project Affected) बंद पाडले आहे. त्यामुळे गुरुवारी प्रकल्पग्रस्तांची तातडीने बैठक घेण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी अधिक्षक अभियंता यांनी जिल्हाधिकारी (Collector) यांना पत्र दिले आहे. प्रकल्प बधितांच्या दोन गटात शाब्दिक वाद वाढल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख आंमश्या पाडवी यांनी समेट घडविण्यासाठी प्रयत्न केले.

देहली प्रकल्पाचे काम हे प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन (Rehabilitation) व अन्य कारणांमुळे गेल्या ४० वर्षापासून रखडलेले होते. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या अद्याप अपूर्ण असल्याने देहली मध्यम प्रकल्पाचे घड भरणीचे काम अंतिम टप्यात असताना, लोकसंघर्ष मोर्चाचे सुकलाल पांडू तडवी, गुलाब माकत्या तडवी व इतर कार्यकर्त्यांनी २६ एप्रिलला दुपारी प्रकल्पाचे काम बंद करण्यास भाग पाडले, त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झालेवरच प्रकल्पाचे काम चालू करावे ,असेही त्यांनी सूचित केले. त्या अनुषंगाने अधिक्षक अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी तत्काळ प्रकल्पस्थळी जाऊन प्रकल्पग्रस्त व लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे व कार्यकर्त्यां समवेत पुनर्वसन गावठाणात बैठक घेतली. या संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख आंमश्या पाडवी आपल्या कार्यकर्तेसह प्रकल्पाच्या कामावर दाखल झाले, त्याठिकाणी दोन गटात वादविवाद सुरू होता. दोन्ही गटाची समजूत काढीत वाद मिटविला.

पुराचा गावांना धोका

गत कालावधीत अनेक आंदोलन आणि पाठपुरावा करून देहली मध्यम प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली होती यावर्षी पाणी रोखले जाईल अशी अपेक्षा असताना लोक संघर्ष मोर्चा तर्फे पुन्हा काम बंद करण्यात आल्याचे समजते. लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्यांनी शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करावा किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड के. सी. पाडवी यांच्याकडे जावे. पावसाळ्यात नदीला पुर आला तर आहे ते बांधकाम वाहून जाईल आणि यामुळे परिसराला प्रचंड धोका निर्माण होऊन गावेच्या गावे वाहून जाण्याची शक्यता आहे. असे आमशा पाडवी यांनी म्हटले आहे. धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करणे गरजेचे आहे. दरम्यान, बैठकी अंती काम सुरु करणेबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. असे जिल्हाधिकारी यांना अवगत करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com