गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी 'प्रोजेक्ट बंधन'

उत्तर भारतातील कपाशीवरिल बोंडअळीच्या नियंत्रणासाठी पीबी नॉट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला
Pink Bollworm
Pink BollwormAgrowon

उत्तर भारतातील कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा (Pink Boll Worm)प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्रिय कापूस संशोधन संस्था, (सीआयसीआर), राज्यातील कृषी विद्यापीठे, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र (एसएबीसी) आणि काही खासगी संस्था यांच्या तर्फे पीबी नॉट तंत्रज्ञान (PBKnot Technology) वापरुन या किडीच्या नियंत्रणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला ''प्रोजेक्ट बंधन'' (Project Bandhan) हे नाव देण्यात आले आहे.

Pink Bollworm
गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी टाळा पूर्वहंगामी कपाशी

कपाशीमध्ये बोंडअळ्यांच्या प्रादुर्भावामुळे फवारण्याची संख्या वाढत आहे त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. उत्तर भारतातील कपाशीवरिल बोंडअळीच्या नियंत्रणासाठी पीबी नॉट या तंत्रज्ञानातून फेरोमोन सापळ्यासह किडीच्या संभोगामध्ये व्यत्यय आणून मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. अशी माहिती केंद्रिय कापूस संशोधन संस्थेचे संचालक वाय. जी. प्रसाद यांनी दिली. पिकाच्या फुले लागण्याच्या अवस्थेपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण हंगामात या तंत्राचा अवलंब केल्यामुळे पिकाचे गुलाबी बोंडअळीपासून संरक्षण होणार आहे, असे ते म्हणाले.

Pink Bollworm
गुलाबी बोंड अळी समस्येसाठी सुरुवातीपासून हवी तयारी

पीबी नॉट या तंत्रज्ञान हे एक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असून जे गुलाबी बोंडअळीच्या पुनरुत्पादन क्रियेमध्ये हस्तक्षेप करते ज्यामुळे किडीची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होते. पिकाचे कमी प्रमाणात नुकसान होते. केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने (सीआयबीआरसी) २०१९-२० मध्ये भारतातील गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथमच एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) धोरणांमध्ये या तंत्रज्ञानाला मान्यता दिली होती.

काय आहे पीबी नॉट तंत्रज्ञान
या तंत्रामध्ये पींक बोलवर्म नॉट (पीबी नॉट) म्हणजे एका छोट्या दोरीचा वापर करन्यात आला आहे जी कपाशीच्या रोपाला सहजपने बांधता येते. या दोरीवर मादी बोंडअळीतील गॉसीप्लर सुगंध लावण्यात आला आहे. गॉसीप्लर सुगंधामुळे गुलाबी बोंडअळीचे नर पतंग या झाडाला बांधलेल्या दोरीकडे आकर्षित होतात आणि गोंधळतात त्यामुळे नर पतंगांना मादी पतंगाना शोधण्यापासून आणि संभोग करण्यापासून रोखले जाते आणि गुलाबी बोंडअळीची संख्या नियंत्रित राहते

Pink Bollworm
कापूस पिकाची लागवड करताना काय खबरदारी घ्यावी ?

"गुलाबी बोंडअळी सारख्या घातक किडीच्या नियंत्रणासाठी संभोग व्यत्यय तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे," असे जोधपूरच्या दक्षिण आशिया जौवतंत्रज्ञान केंद्राचे (एसएबीसी) संचालक भगीरथ चौधरी यांनी सांगितले, हे तंत्रज्ञान यंदाच्या खरिप हंगामात कापूस उत्पादक सात प्रमुख राज्यांतील १६ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला “प्रोजेक्ट बंधन” असे नाव देण्यात आले आहे.

रासायनिक फवारणीवर अवलंबून
गुलाबी बोंडअळी ही भारतीय कपाशीवरिल प्रमुख किड असून दुरवर्षी सुमारे १२ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीचे नियंत्रण प्रामुख्याने रासायनिक पद्धतीने केले जाते. परंतु प्रभावी किडनाशकाची उपलब्धता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करणे कठिण जाते. त्यामुळे विविध कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळी ही किड कायमची स्थिरस्थावर झाली आहे, असे चौधरी यांनी सांगीतले.

केंद्रिय कापूस संशोधन संस्था,नागपूर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अंबुजा सिमेंट फाउंडेशन, पीआय फाउंडेशन, अॅग्रोव्हिजन फाउंडेशन, राज्य कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र आणि स्थानिक संस्थांच्या भागीदारीतून देशभरातील एकूण १,२०० एकर क्षेत्रावर प्रत्येकी १९ क्लस्टरमध्ये "प्रकल्प बंधन" राबविण्यात येणार आहे.

उत्तर भारतातील ४६९ एकर क्षेत्रावरिल कपाशीमध्ये पीबी नॉट बांधन्यात आले आहे. जिथे २५० हून अधिक शेतकऱ्यांना पीबी नॉट बांधन्याचे आणि फेरोमोन सापळे बसविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पंजाबमधील भटिंडा, मानसा आणि फाजिल्का जिल्ह्यांमध्ये सुमारे १९३ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविला जात आहे. हरियाणा राज्यातील सिरसा आणि फतेहाबाद जिल्ह्यांमध्ये सुमारे १५० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविला जात आहे. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये हनुमानगड आणि गंगानगर जिल्ह्यात सुमारे १२४ एकरमध्ये पीबीनॉट तंत्रज्ञान राबविले जात आहे.

उत्तर भारतात खरीप हंगामाच्या सुरुवातीला कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या अळीचे सामान्यत: अल्प जीवनचक्र असते आणि ते ४ -५ पिढ्यांचा गुणाकार करू शकते, ज्यामुळे कापसाच्या संवेदनशिल अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव वाढून कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम होते, असे चौधरी म्हणाले.
गेल्या खरीप हंगामात मध्य विभागात ''प्रोजेक्ट बंधन'' राबविण्यात आले. कीड नियंत्रणात आणण्यासाठी ते अतिशय प्रभावी असल्याचे एसएबीसीला आढळून आले. ३०० एकर क्षेत्रावर घेतलेल्या प्रात्यक्षिकातून गुलाबी बोंडअळीमुळे होणाऱ्या नुकसानीत ९० टक्के घट नोंदविण्यात आली आणि कापसाच्या उत्पादनात एकरी १.५ ते २ क्विंटलने वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com