Agriculture Minister : केंद्र सरकारकडून कृषी संशोधनाला चालना : कृषिमंत्री तोमर

ईशान्येतील राज्यांचा विकास घडवून आणण्यासाठी शेतीला महत्त्व दिले पाहिजे. तसेच कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार आव्हानांना तोंड देण्यास समर्थ आहे.
Narendra Tomar
Narendra TomarAgrowon

कृषी क्षेत्र (Agriculture Sector) सर्वाधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देताना कोणतीही अडचण येणार नाही. केंद्र सरकार आणि ईशान्यकडील राज्य सरकारे सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकत्र काम करत आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले. ते गुरुवारी (ता.५) अरुणाचल प्रदेशातील पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी अरुणाचलचे कृषी मंत्री तागे टाकी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, "केंद्र सरकार संशोधन आणि कृषी यांच्यात मध्यस्थी करण्याचा आणि शेतकऱ्यांना वैज्ञानिक सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संस्थेच्या स्थापनेमुळे ईशान्यकडील राज्यांसह अरुणाचल प्रदेशमध्ये कृषी शिक्षण आणि संशोधन चालना मिळते. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि त्या दिशेने संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे."

ईशान्येतील राज्यांचा विकास घडवून आणण्यासाठी शेतीला महत्त्व दिले पाहिजे. तसेच कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार आव्हानांना तोंड देण्यास समर्थ आहे. तसेच देशात पुरेसा अन्नसाठा उपलब्ध आहे, असेही तोमर यांनी एका अधिकृत पत्रकात म्हटले आहे.

Narendra Tomar
Narendra Singh Tomar : राष्ट्रीय डिजिटल कृषी प्रकल्पावर काम चालू

पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी देशाच्या कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणात सक्रियपणे योगदान देतील. महाविद्यालयात प्रदान करण्यात आलेल्या नवीन सुविधा विद्यार्थ्यांना अधिक कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित आणि प्रेरित करतील आणि तांत्रिक फायदे देऊन त्यांची क्षमता वाढविण्यात मदत करतील, अशी आशाही तोमर यांनी व्यक्त केली.

अरुणाचलचे कृषी मंत्री तागे टाकी म्हणाले, "शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, निर्यातीच्या संधी आणि उत्पादनात शाश्वत वाढीसाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक पिकांना महत्त्व देण्यात येत आहे."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com