Solapur APMC : सोलापूर बाजार समितीकडून संचालक मुदतवाढीचा प्रस्ताव

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील प्रमुख पाच बाजार समित्यांमध्ये गणली जाते. त्यामुळे बाजार समितीवर वर्चस्वासाठी प्रमुख राजकीय पक्ष सातत्याने प्रयत्न करत असतात.
Solapur APMC
Solapur APMC Agrowon

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Agricultural Produce Market Committee) संचालकांना एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, यासाठी बाजार समितीच्या मासिक बैठकीमध्ये ठराव करून पणन संचालकांकडे पाठवण्यात आला आहे.

परंतु या प्रस्तावाला पणन संचालकांकडून मान्यता मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील प्रमुख पाच बाजार समित्यांमध्ये गणली जाते. त्यामुळे बाजार समितीवर वर्चस्वासाठी प्रमुख राजकीय पक्ष सातत्याने प्रयत्न करत असतात.

सध्या भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांची कारकीर्द तशी बरी राहिली. पण बाजार समितीत संचालकांतील अंतर्गत कलह मात्र कायम राहिले. आता बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत येत्या जून महिन्यामध्ये संपेल.

Solapur APMC
Jalgaon APMC Election : जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली

त्यामुळे जून-जुलै पूर्वीच मतदार याद्या तयार करणे अपेक्षित आहे. परंतु कोरोना काळामध्ये बाजार समितीची कामे रखडली होती. शिवाय, सध्या रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

तसेच शेतकरी निवास बांधकामाचे काम देखील रखडलेले आहे. ही सर्व कामे करण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे संचालकांनी पणन संचालकांकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे.

मात्र, पणन संचालक या कारणावर मुदतवाढ देणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरीकडे पणन संचालकांनी ही मुदतवाढ नाकारली तर बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगूल वाजेल.

मुदतवाढ मिळणार ?

सोलापूर बाजार समितीच्या संचालकांना एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, यासाठी पणन संचालकांकडे संचालक मंडळाने नुकताच प्रस्ताव पाठविला आहे.

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे सभापतिपद आहे. ते स्वतः मुदतवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यात सध्या राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला अपयश येईल, अशी शक्यता कमीच आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com