Silk Industry : आधुनिक तंत्र वापरून रेशीम उद्योगातून समृद्ध व्हा

कटिंग पासून तुती लागवड केल्यापेक्षा रोपाची लागवड केल्यास तीन महिन्यात तुतीचे पान उपयोगात आणता येतात व उद्योग सुरू करता येतो.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

Jalna News : आधुनिक तंत्र वापरून रेशीम उद्योगातून समृद्ध व्हा, असा सल्ला रेशीम विभागाचे माजी उपसंचालक दिलीप हाके यांनी दिला. डोणगाव जि. जालना येथे ऍग्रो इंडिया गट शेती संघाच्या 218 व्या द्वादस कार्यक्रमात श्री. हाके मार्गदर्शन करीत होते.

श्री हाके म्हणाले, की रेशीम उद्योगात आलेल्या नवनवीन संकल्पना जसे चॉकी म्हणजे आठ-दहा दिवसाची अळीच विकत घ्यायची आणि 18 दिवस संगोपन करून कोश निर्मिती करायची.

तसेच कटिंग पासून तुती लागवड केल्यापेक्षा रोपाची लागवड केल्यास तीन महिन्यात तुतीचे पान उपयोगात आणता येतात व उद्योग सुरू करता येतो. सर्व उपाय केल्यास आपणास 18 दिवसातच एक बॅच मिळू शकते.

Silk Farming
Silk Farming : शेतकरी नियोजन : रेशीम शेती

कोश विकण्यासाठी बेंगलोरला जाण्याची आवश्यकता नसून जालना येथेच होलसेल मार्केट सुरू आहे. आधुनिक पद्धतीने हा उद्योग केल्यास सरासरी महिन्याला एक बॅच निघू शकते आणि त्यातून शेतकऱ्यास एकरी एक लाख प्रति महिना मिळू शकतो.

कार्यक्रमाच्या सुरवातीस सकाळी शिवार फेरी झाली. त्यानंतर बाबासाहेब कापसे यांच्या अंगूर बागेत शिवार फेरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन डोणगाव येथील ऍग्रो इंडिया गट शेतीची मंडळी राजू घोडके, सईद शेख, श्री गवई यांनी केले. भाऊराव आटपळे यांनी संचलन केले कार्यक्रमास भाऊराव दरेकर, लक्ष्मण सवडे, रामेश्वर गायके, संतोष बोर्डे, इत्यादी मंडळी यांनी विशेष चर्चेत भाग घेऊन बराच प्रश्नांची उत्तरे जाणून घेतले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com