Emotions : आपल्यातल्या निरागसतेला जपा

लहान मुलांबाबत महान तत्त्वज्ञ खलील जिब्रान जे काही भाष्य करतो ते आपल्याला पालक म्हणून खूप काही शिकवणारं आहे. तो म्हणतो, की तुमची मुलं ही तुमची मुलं नसतात, ती तर जीवनाच्या स्वतःच्या उद्याच्या आकांक्षेची लेकरं असतात.
Emotions
Emotions Agrowon

लहान (Children) मुलांबाबत महान तत्त्वज्ञ खलील जिब्रान जे काही भाष्य करतो ते आपल्याला पालक म्हणून खूप काही शिकवणारं आहे. तो म्हणतो, की तुमची मुलं ही तुमची मुलं नसतात, ती तर जीवनाच्या स्वतःच्या उद्याच्या आकांक्षेची लेकरं असतात. ते तुमच्यातून उगवतात तरी स्वतंत्र असतात. ते तुमच्या जवळ असतात, तरी तुमचे नसतात.

तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता, पण तुमची प्रज्ञा नाही देऊ शकत. कारण त्यांच्याकडे स्वतःची प्रज्ञा असते. तुम्ही त्यांच्या शरीरांना निवारा देऊ शकता, आत्म्यांना नव्हे; कारण त्यांचे आत्मे येणाऱ्या उद्याच्या घरात नांदत असतात. जिथे तुम्ही कधीच जाऊ शकत नसता. कारण गतायुष्य हे कधीही परतून येत नसतं! तसं आपल्या प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं.

Emotions
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

पण वाढत्या वयाने आलेले शहाणपण आपल्याला लहान मुलासारखं वागू देत नाही. आपण या मोठेपणाच्या झुली पांघरून हौसेने प्रत्येकवेळी नव्या भूमिकेत शिरतो. नवरा, बाप, जावई... किंवा पुढे जाऊन समाजातली विविध मानाची किंवा अधिकाराची पदं भूषवताना अनेकदा इतरांना डावी वागणूक देतो, वेठीस धरतो. चालत आलेल्या रितींप्रमाणे वर्चस्ववादी वागतो. जे अगदीच निरर्थक असतं.

समाज नावाच्या आरशात आपल्याला जे पहायला मिळतं तसंच जगण्याचं नाटक आपण करतो. या सगळ्यात आपल्यातलं एक बच्चू गुदमरून जातं. त्याला आपण कधीच खुलू दिलेलं नसतं! लोक काय म्हणतील हा विचार करून आपण कधीच आपल्यातल्या निरागसतेला बाहेर येऊ देत नाही. मनमुराद हसत नाही किंवा रडतही नाही.

एकदा का तुमच्या वागण्याचा एक परीघ ठरून गेला, नंतर समाज तुम्हाला त्याच चौकटीत बंदिस्त करतो. त्याहून वेगळे तुम्ही वागलात तर समाज तुम्हाला हसतो. म्हणून मुळात समाजाला अशी कुठली चौकटच आपण आपल्या भोवती आखू देऊ नये!

Emotions
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

आपल्यातल्या निरागसतेला, रसिकतेला जपावं. एखाद्या विनोदावर आपल्याला खळखळून हसता यावं. एखाद्या कवितेवर उत्स्फूर्त दाद देता यावी. एखाद्या गण्याच्या सुरावटीत डुंबून जाता यावं. देहभान हरपून वाचता यावी एखादी कादंबरी किंवा गढून जाता यावं एखाद्या चित्रपटाच्या परिकथेत! होता यावं मनोमन त्यातले एखादे कॅरेक्टर.

एकदा स्वतःला हे विचारता यावं की किती दिवस झालेत हे असं सगळं करणं विसरून? म्हणून मुलांना काही सांगण्या-शिकवण्याच्या नादात आपण त्याला त्याचं बालपण एन्जॉय करू देतोय ना? हेही स्वतःला विचारलं पाहिजे. या संदर्भात कवी निदा फाजली म्हणतात, की...

‘बच्चों के छोटे हाथों को, चांद सितारे छूने दो,

चार किताबें पढकर ये भी, हम जैसे हो जाएंगे।’

आपल्याला मुलासोबत मूल होता यावं. व त्या मुलाला खुश्शाल हुंदडू द्यावं अधुनमधुन. हसू द्यावं, खेळू द्यावं, लेकरांसोबत, निसर्गासोबत, रमू द्यावं. निदान एवढं तरी आपल्याला स्वतःला बजावता यावं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com