Agriculture Department : कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

राज्यात कृषी विभागाने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. जलयुक्त शिवारसारख्या योजनेचे विभागाला पारितोषिक मिळाले.
Nagar Protest
Nagar ProtestAgrowon

Nagar News : के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी निवारण समितीने कृषी विभागातील (Agricultural Department) अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतन त्रुटीबाबत घेतलेल्‍या अन्यायकारक भूमिकेचा निषेध करत शुक्रवारी (ता. ३) नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

राज्यात कृषी विभागाने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. जलयुक्त शिवारसारख्या योजनेचे विभागाला पारितोषिक मिळाले.

असे असताना के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी निवारण समितीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतन त्रुटीबाबत घेतलेल्‍या अन्यायकारक भूमिका घेतली आहे.

Nagar Protest
Agriculture Department : अमरावती जिल्ह्यात कृषी विभाग प्रभारी

कृषी विभागातील तांत्रिक संवर्गाची समकक्षता इतर विभागातील तांत्रिक संवर्गाबरोबर करण्याबाबत राज्य शासनास पत्राद्वारे कळवल्याची बाब के. पी. बक्षी समितीसमोर पुराव्यानिशी मांडण्यात आली होती. असे असतानाही समितीचा अहवाल खच्चीकरण करणारा आहे.

कृषी विभागातील तांत्रिक संवर्गाची समकक्षता इतर विभागातील तांत्रिक व व्यावसायिक (वैद्यकीय, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी) संवर्गाशी प्रस्थापित करून तालुका कृषी अधिकारी संवर्गास उपअभियंता, पशुवैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याप्रमाणे नियमित वर्ग १ चा दर्जा व वेतन श्रेणी मिळावी, फक्त तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी ही पदे एमपीएससी मार्फत भरावीत, कृषी विभागातील मंजूर पदे भरावीत यांसह विविध मागण्यासाठी शुक्रवारी (ता.३) नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी राजाराम गायकवाड, विलास नलगे, गहिनीनाथ कापसे, अनिल गवळी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, दीपक सुपेकर, राजेंद्र सुपेकर, सुधीर शिंदे, किरण मोरे, पोपटराव नवले, महेंद्र ठोकळे, अंकुश टकले, मोहन भोसले, रवींद्र तागड, दत्ता डमाडे, कांचन तागड, मनीषा लवटे, गिरीश बिबवे, गजानन घुले, रवींद्र माळी, आबासाहेब भोरे, धनंजय हिरवे, अश्विनी माने, प्रकाश कर्पे, प्रफुल्ल पाटील, बाळकृष्ण भुजबळ, संजय मेहेत्रे, धनराज गुंड, धनश्री अश्रीत, क्रांती चौधऱी, अमोल काळे आदींसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com