Jaljeevan Mission : ‘जल जीवन’अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करा’

Water Supply : जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करा असे प्रतिपादन अंबडचे सहाय्यक गटविकास अधिकारी ए.ए.चव्हाण यांनी केले.
Jaljeevan Mission
Jaljeevan Mission Agrowon

Jaljeevan Mission Jalna News : जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करा असे प्रतिपादन अंबडचे सहाय्यक गटविकास अधिकारी ए.ए.चव्हाण यांनी केले.

अंबड येथे ग्रामविकास संस्थेच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद जालनाच्या सहकार्याने आयोजित ग्रामस्तरीय भागधारक क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : ‘जलजीवन’ची दोन वर्षांत ३० ते ४० कामेच पूर्ण

याप्रसंगी ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे, संजय डोंगरदिवे, भगवान तायड, विस्तार अधिकारी एस. के. खिल्लारे, बबनराव झीने यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री चव्हाण म्हणाले, की जल जीवन मिशन योजनेची लोकसहभागातून, पारदर्शकपणे, गुणवत्तापूर्ण, अंमलबजावणी करून शाश्वत ग्रामविकास करा.

प्रास्ताविक ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी केले. प्रशिक्षणामध्ये मनुष्यबळ विकास तज्ञ प्राचार्य जयप्रकाश बागडे, विनोद बागूल, मा. भगवान तायड यांनी जल जीवन मिशन, लोकसहभाग, भागधारकांची भूमिका व जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

आभार बालाजी बिरादार यांनी मानले. प्रशिक्षणासाठी अंबड तालुक्यातील नागझरी परिसरातील १४ गावातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com