Crop Damage : पीक नुकसानग्रस्ताना तत्काळ मदत द्या

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. परंतु, काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यांना तत्काळ मदत करावी.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. परंतु, काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यांना तत्काळ मदत करावी.

उजनीचा उजवा कालवा फुटल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जलसंपदा व कृषी विभागांनी तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जिल्हा विकास यंत्रणाअंतर्गत सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकाऱ्यांचा कामकाज आढावा व पदाधिकारी यांच्या सोबत नियोजन भवनात झालेल्या समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार समाधान आवताडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे व्यासपीठावर उपस्थित होते.

Crop Damage
Hailstorm Crop Damage : गारपिटीचा ज्वारीसह केळी, पपई, आंबा बागांना तडाखा

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही विचार करावा.

सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन सकारात्मकतेने काम करत असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी परस्पर सहकार्याने जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यासाठी कार्य करावे. अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेची कामे आत्मियतेने करून मार्गी लावावीत.

बसवेश्‍वर स्मारकाचे काम मार्गी लावा

मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक साकारले जाणार आहे. हे काम तत्काळ मार्ग लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. महाराजस्व अभियानातून शेतरस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.

जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडून १ हजार ६०० रोव्हर मोजणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे भविष्यात मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सचिवांना संपर्क साधून विषय मार्गी लावण्याच्या सूचना

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शहरातील दोन उड्डाणपूल, समांतर जलवाहिनी आणि शहराचा पाणीपुरवठा या तीन महत्त्वाच्या विषयांचा सुक्ष्म आढावा घेतला.

तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आपल्या अनुभवाचा दाखला देत थेट सात विभागांच्या सचिवांना संपर्क साधून विषय तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आढावा बैठकीदरम्यान केल्या. पालकमंत्र्यांनी मनावर घेतलेले हे विषय लवकर मार्गी लागतील असे चित्र यातून निर्माण झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com