
Mangaon News : यंदा योग्य हवामानामुळे कडधान्य शेती बहरून आली आहे. त्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने रब्बी हंगामातील (Rabbi Season) तयार झालेल्या कडधान्य पिकाच्या झोडणीला (Harvesting) माणगाव तालुक्यात सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी सततच्या अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या कडधान्य शेतीला (Pulses Farming) यावर्षी जानेवारीमधील योग्य हवामानाने तारले आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीला कडधान्य शेती पूर्णतः तयार झाली आहे.
माणगाव तालुक्यात ४५० ते ५०० हेक्टर शेतीवर कडधान्य शेती केली जाते. अनेक शेतकरी या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवतात. मूग, मटकी, वाल, हरभरा, तूर, चवळी इत्यादी कडधान्याची लागवड व उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
गावाकडील शेतीतील कडधान्यांना शहरातही चांगली मागणी आहे. वाल, मटकी, घेवडा, मूग, हरभरे, चवळी इत्यादी कडधान्य पिकांचा बहर आला आहे. काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी या कडधान्य पिकाची काढणी करून झोडणीला सुरुवात केली आहे.
कडक उन्हात कडधान्ये चांगली सुकून जातात व झोडणी करणे सोपे जाते. त्यामुळे या कामांना वेग आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.