Paddy Procurement : रत्नागिरीतून ३२,९१६ क्विंटल भात खरेदी

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदीसाठी जिल्ह्यात १४ संकलन केंद्रे निश्चित करण्यात आली होती.
Paddy Procurement
Paddy ProcurementAgrowon

Ratnagiri News : जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या भाताला शासनाकडून हमीभाव (MSP) दिला जातो. भात खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीकरिता (Online Registration) शेतकऱ्यांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले; मात्र तरीही खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभला.

२६ हजार क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट असताना ३२ हजार ९१६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदीसाठी जिल्ह्यात १४ संकलन केंद्रे निश्चित करण्यात आली होती.

Paddy Procurement
Rice export: तांदूळ निर्यातीवरील बंधने कायम राहणार; केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा नाहीच

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भात स्वत:ला ठेवून दोन पैसे मिळविण्यासाठी भात विक्री करता येते. शिरळ केंद्र वगळता अन्य केंद्रावर चांगली खरेदी झाली. जिल्ह्यातील १७६६ शेतकऱ्यांनी ३२ हजार ९१६ क्विंटल भाताची विक्री केली.

भात विक्रीसाठी सुरुवातीला ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सुरुवातीला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे भात खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भात विक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

जिल्ह्यातील १७६६ शेतकऱ्यांनी ३२ हजार ९१६ क्विंटल भात विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच कोटी ९२ लाख रुपये जमा करण्यात आले. यावर्षी भाताला प्रति क्विंटल २०४० रुपये दर देण्यात आला. विक्रीनंतर लगेच पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.

Paddy Procurement
Rice Export : बासमती तांदळाचे दर तेजीत; निर्यात वाढली

केंद्र - खरेदी (क्विंटल)

खेड - - ८६७८

गुहागर - १७०४.८०

रत्नागिरी - ३१६२.४०

लांजा - १६७.६०

केळशी - १८०१.२०

राजापूर - १२५५.२०

पाचल - १५७०.४०

संगमेश्वर- ३४१२.००

दापोली - ९०७.६०

चिपळूण - ४३६१.६०

आकले - ७५०

मिरवणे - १९२४.४०

शिरगाव - ३२२०.८०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com