Minister Dr. Vijayakumar Gavit : दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार, पालकमंत्री डॉ. गावित यांची माहिती

जिल्ह्यासह सर्व तालुक्यांतील नवीन रस्ते तयार करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला असून, यासाठी चार हजार कोटींची निधी लागणार आहे.
Dr. Vijayakumar Gavit
Dr. Vijayakumar GavitAgrowon

Nandurbar News : येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे (Road Work) जाळे निर्माण करणार, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Minister Dr. Vijayakumar Gavit) यांनी विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी केले.

नंदुरबार येथे आमदार निधी व नगरविकास निधीतून विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा झाला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपचे महामंत्री विजय चौधरी, हिरा उद्योगसमूहाचे डॉ. रवींद्र चौधरी, युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, माजी नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, संतोष वसईकर, बांधकाम विभागाचे उपअभियंता बालाजी कांबळे, सहायक अभियंता अभिजित वळवी यांच्यासह लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

Dr. Vijayakumar Gavit
Nilesh Lanke : रस्ते झाल्याशिवाय हटणार नाही

डॉ. गावित म्हणाले, की जिल्ह्यासह सर्व तालुक्यांतील नवीन रस्ते तयार करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला असून, यासाठी चार हजार कोटींची निधी लागणार आहे.

या नवीन रस्त्यांसाठी या वर्षी दोन हजार कोटींची तरतूद केली असून, पुढच्या वर्षी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या दोन वर्षांत कुठल्याही व्यक्तींना कुठल्याही पाड्या व वस्त्यांमध्ये बारमाही जाण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रस्ते चांगले होतील.

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून, जिल्ह्याचे १०० टक्के सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी उपसा सिंचन व पाटचारीद्वारे तापीचे पाणी आणण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले.

या संदर्भात अधिवेशनकाळात बैठक घेण्यात येणार असून, यासाठी लागणारा आवश्यक निधी आदिवासी विकास विभागातून उपलब्ध करून देण्यात येईल.

Dr. Vijayakumar Gavit
Chandrapur : चंद्रपुरातील पाणंद रस्ते निधीअभावी रखडले

तरुणांना रोजगार देण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील तरुणांना, महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते व इतर नागरी विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com