Rabi Crop : पैठणमध्ये उन्हामुळे रब्बी पिके कोमेजली

सध्या दिवसाचे तापमान वाढत असून, रब्बी हंगामातील कोवळ्या पिकांवर याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.
Rabi Crop
Rabi CropAgrowon

Paithan News : सध्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी आवश्यकतेपेक्षा जास्तीचे ऊन फेब्रुवारी महिन्यातच पडत आहे. त्यामुळे जास्तीच्या उन्हाचा रब्बी पिकांवर (Rabi Crop) प्रतिकूल परिणाम होत असून, रब्बी हंगामातील (Rabi Season) हरभरा (Chana), गहू (Wheat), भुईमूग पिकांचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यातच जमिनीतील पाणी पातळी खालावत असल्याने पैठण तालुक्यातील शेतकरी अधिकच चिंतेत पडला आहे.

सध्या दिवसाचे तापमान वाढत असून, रब्बी हंगामातील कोवळ्या पिकांवर याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.

Rabi Crop
Rabi Sowing : रत्नागिरीत रब्बी क्षेत्रात दोन हजार हेक्टरने वाढ

जास्तीच्या उन्हामुळे कितीही पाणी भरले तरी पिके कोमेजलेली दिसत आहेत. पिकांना भरलेले पाणी लगेचच जमिनीत मुरून जमीन कोरडी पडत आहे. एक तर शेतकरी विजेच्या लपंडावामुळे कसरत करून रबी हंगामातील पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे जास्तीच्या उन्हामुळे पाणी भरलेले शेत लगेच कोरडे पडत असून यामुळे रब्बी हंगामातील उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.

दरम्यान, तालुक्यात अनेक ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळत असलेल्या विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. एकूण आठ तासांपैकी दरदिवशी कोणत्या ना कोणत्या समस्येमुळे दोन ते तीन तास वीज कमी प्रमाणात मिळत आहे.

त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे अनेक ठिकाणी गहू, हरभरा, भुईमूग, मका ही पिके कोमेजलेली दिसून येत आहेत. अजून मार्च आणि एप्रिल महिन्याचे ऊन याहून भयंकर असण्याची शक्यता असून त्यामुळे पिकांवर परिणाम होणार आहे.

Rabi Crop
Rabi Crop Loan : रब्बी पीककर्जाचे ८०.६१ टक्के वाटप

मार्च, एप्रिलमध्ये उन्हाचा त्रास अधिक

तालुक्यात भुईमूग पिकाला तर मे महिन्यापर्यंत पाणी भरावे लागते. जास्तीच्या उन्हामुळे दर वर्षांपेक्षा यावर्षी रबी हंगामातील सगळ्याच पिकांना दोन ते तीन अधिकचे पाणी द्यावे लागणार हे चित्र स्पष्ट आहे.

अद्याप मार्च आणि एप्रिल महिन्याचे ऊन याहून भयंकर असण्याची शक्यता असून त्यावेळेस पिकांवर मोठ्या प्रामाणात परिणाम होणार असल्याने याबाबत शेतकऱ्याला आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com