Nagpur Rain News: पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम

छत्तीसगड राज्यात अनेक प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या अनेक नद्या आणि प्रकल्पाच्या पाण्याची पातळी (Water Storage) वाढली आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

नागपूर : विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.१५) पावसाने उघडीप देत काहीसा दिलासा दिला. मात्र पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच होती. परिणामी, गडचिरोली जिल्ह्यातील १८ मार्गांवरील वाहतूक दुसऱ्या दिवशीदेखील सुरळीत होऊ शकली नाही.

पूर्व विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli) हा पावसामुळे सर्वाधिक प्रभावित जिल्हा ठरला आहे. छत्तीसगड राज्यात अनेक प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या अनेक नद्या आणि प्रकल्पाच्या पाण्याची पातळी (Water Storage) वाढली आहे.

त्याचाच परिणाम रस्ते वाहतुकीवर (Road Transportation) झाला असून, पूल पाण्याखाली आल्याने १८ मार्गांवरील वाहतूक दुसऱ्या दिवशीदेखील ठप्प होती. २,७८५ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून, स्थलांतरित व्यक्तींची संख्या ११,८३६ इतकी आहे.

प्रशासनाकडून स्थलांतरित व्यक्तींसाठी ४९ तात्पुरते निवारा केंद्रे उभारण्यात आले आहेत. गोसीखुर्द (Gosikhurd Dam) धरणाचे ३३ पैकी २७ गेट उघडण्यात आले असून, त्याद्वारे २.३० लक्ष क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. चिचडोह बॅरेजचे ३८ पैकी ३८ दरवाजे उघडण्यात आले असून, ४.३४ क्युसेक इतका विसर्ग आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात काही गावांमध्ये पूर ओसरल्यानंतर साथ रोग पसरण्याची शक्यता पाहता प्रशासनाकडून खबरदारीच्या उपायांतर्गत फवारणीवर भर देण्यात आला आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांच्या काही भागांत पावसाने उघडीप दिली होती.

नागपूर विभागात गेल्या २४ तासांत ४५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर विभागातील बारा तालुक्यांत अतिवृष्टीची (Extremely Heavy Rain) नोंद करण्यात आली. त्यामध्ये नागपूर ग्रामीण, उमरेड, कुही, नागपूर शहर, पारशीवणी, कामठी, लाखांदूर, गोंदिया, मोरगाव अर्जुनी, कोरची, नागभीड या तालुक्यांचा समावेश आहे.

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांतील परिस्थिती मात्र नियंत्रणात होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com