Rain : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

विजा, मेघगर्जनेसह, वादळी पावसाचा अंदाज
 Heavy rains return
Heavy rains return Agrowon

पुणे : राज्याच्या अनेक भागांत वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी सुरूच आहेत. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी पाऊस हजेरी लावत आहे. आजपासून (ता. ७) राज्यात पाऊस (Rain) वाढण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, हिस्सार, हर्दोई, गोरखपूर, पाटणा, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून छत्तीसगडपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, शुक्रवारपर्यंत (ता. ९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारनंतर कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली. आज (ता. ७) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

 Heavy rains return
IMD Rainfall: सप्टेंबरमधला पाऊस खरीप पिकांसाठी मारक?


विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

मंगळवार (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :
कुलाबा ५०, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी प्रत्येकी ४०, खालापूर, डहाणू प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :
पंढरपूर ५०, कागल, आजरा ४० प्रत्येकी, शेगाव ३०.

मराठवाडा :
हिंगोली ६०, अंबड, मानवत प्रत्येकी ५०, पैठण, मंथा, लातूर प्रत्येकी ४०, पाथरी, वसमत, शिरूर अनंतपाळ, गंगापूर, उदगीर, सेलू, परळी वैजनाथ, चाकूर प्रत्येकी ३०.

विदर्भ :
तुमसर, हिंगणघाट, चांदूर रेल्वे, दिग्रस प्रत्येकी ४०, काटोल, कळंब, चंद्रपूर, सावळी, नरखेडा, महागाव, सडकअर्जुनी, वर्धा, देवरी, बाभूळगाव प्रत्येकी ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com