Rain : पावसाची उघडीप शक्य

आज विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज
Rain
RainAgrowon

पुणे : कमी दाबाची क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस यामुळे राज्यात कोसळणार पाऊस दोन दिवस काहीशी उघडीप देण्याची चिन्हे आहे. मात्र, आज (ता. १८) विदर्भात विजांसह पावसाची, तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह, ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या श्रावण सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील कमी कमी दाब क्षेत्रापासून ईशान्य बंगाल उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनच्या आस उत्तरेकडे सरकण्याचे संकेत आहेत. यातच दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्याच्या अनेक भागात बुधवारी ऊन सावल्यांचा लपंडाव सुरू होता. आज (ता. १८) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात एकामागून एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहेत. दक्षिण म्यानमार आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे उद्यापर्यंत (ता. १९) उत्तर बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. दरम्यान मध्य भारतातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर सक्रिय आहे.

Rain
Rain Update : पाऊस ओसरण्याची चिन्हे

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार
कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भ, मराठवाड्यात हलक्या सरींसह पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सर्वाधिक १७० तर पेठ येथे १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Rain
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कृषी-हवामान सल्ला

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : तलासरी, जव्हार प्रत्येकी १३०, वाडा १२०, पालघर, माथेरान ११०, वसई १००, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत, शहापूर, विक्रमगड प्रत्येकी ९०, पेन, पालघर, मोखेडा, वैभववाडी प्रत्येकी ८०, मुरबाड, खालापूर, लांजा प्रत्येकी ७०, ठाणे, सुधागडपाली, सांताक्रूझ प्रत्येकी ६०, दापोली, रोहा, देवगड प्रत्येकी ५०.
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी १७०, पेठ १५०, लोणवळा १३०, हर्सूल ११०, गगनबावडा ९०, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर प्रत्येकी ८०, ओझरखेडा ७०, अक्कलकुवा, सुरगाणा, वेल्हे प्रत्येकी ५०, कळवण, अक्रणी प्रत्येकी ४०, पौड, तळोदा, राधानगरी, शाहूवाडी, जावळीमेढा, आजरा, पन्हाळा, चंदगड प्रत्येकी ३०.
घाटमाथा : लोणावळा, आंबोणे १३०, दावडी १००, शिरगाव, वळवण प्रत्येकी ९०, शिरोटा, खोपोली, ताम्हिणी प्रत्येकी ८०, डुंगुरवाडी ७०.
..........
पुणे ः आज (ता.१८) राज्यातील पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com