Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

जगबुडी, नारिंगी नद्यांनी धोक्याती पातळी ओलांडली; आपत्ता व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
Rain Update
Rain UpdateAgrowon

रत्नागिरी ः जिल्ह्यात पावसाचा जोर (Rain Force In Ratnagiri) वाढला असून खेडमधील जगबुडी आणि नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीपात्रातील पाणी किनाऱ्यावरील लोकवस्तीमध्ये शिरू लागल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. पूरप्रवण क्षेत्रात येणारी गावे आणि शहरातील नागरिक, व्यापारी यांना दक्ष राहण्याच्या इशारा देण्यात आला आहे. खेड बाजारपेठेत पूर (Flood) आलेला नसला तरी या दोन्ही नद्यांच्या पाण्याचा वेढा शहराला कधीही पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) यंत्रणा सजग झाली आहे.

Rain Update
Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर

मंगळवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात मंडणगडला १०५ मिमी, दापोली ६२, खेड १२१, गुहागर १५, चिपळूण ९३, संगमेश्‍वर १०८, रत्नागिरी १४, लांजा ९५, राजापूर ५१ मिमी नोंद झाली आहे.

गेले आठ दिवस खेड तालुक्यात संततधार सुरू आहे. त्यामुळे जगबुडी, नारंगी नद्या दुथडी भरून असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. मोठ्या नद्यांना येऊन मिळणारे ओढे, ओहोळ यांचे पाणी वाढले असून डोंगराळ भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारी भागातील शेतीची कामे रखडली आहेत. पावसाचा जोर वाढतच राहिला तर खेड शहरात कधीही पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. अशी निर्माण झाल्यास मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ)पथक तैनात केले आहे.

Rain Update
Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ७२ मिमी पाऊस

१८ प्रशिक्षित जवान आणि दोन वरिष्ठ अधिकारी खेड शहर व परिसरातील पूर्वपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरड प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी याच पथकावर आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या चिपळूण तालुक्यातील नांदीवसे ग्रामपंचायतीमधील राधानगरवाडीच्या वरील डोंगरास २०० मीटरची भेग पडली. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे.

समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील भात लावण्यांची कामे वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर भात लागवड होते. आतापर्यंत ३० हजार हेक्टरवरील भात लागवड पूर्ण झाली आहे. साधारणपणे चाळीस टक्क्यांहून अधिक लागवडीची कामे पूर्ण झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com