टेंभुर्णीत वादळी वाऱ्यासह पावसाचा पिकांना दणका

ऊस, केळी, डाळिंब, आंब्याचे मोठे नुकसान
टेंभुर्णीत वादळी वाऱ्यासह पावसाचा पिकांना दणका
Heavy RainAgrowon

सोलापूर ः वादळीवाऱ्यासह पावसाने (Heavy Rain) टेंभुर्णी व परिसरातील चांदज, आलेगाव बुद्रुक, आलेगाव खुर्द, वडोली, रांझणी, नगोर्ली, शेवरे, दगड अकोले, आढेगाव भागाला दोन दिवसांपूर्वी चांगलेच झोडपले. वादळी वाऱ्यासह (Stormy Rain) झालेल्या पावसाने या भागातील ऊस (Sugarcane), केळी (Banana), डाळिंब (Pomegranate), आंबा (Mango) या पिकांना मोठा फटका बसला.

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन आणि सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा कडकडाट ठरला आहे. पण पाऊस काही पडत नाही. पण बुधवारी (ता. ८) सायंकाळी अचानकपणे आलेल्या वादळवाऱ्य़ासह पाऊस झाला. पावसाने टेंभुर्णी परिसराला जोरदार तडाखा दिला. त्यात या भागातील केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. अनेक ठिकाणी ऊस आडवा पडला. तर डाळिंब, आंब्याचेही नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या केळी बागा सध्या फळावर आहेत. त्यांना त्याची अधिक झळ बसली. या भागातील सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले.

---------------

चौकट ः

पंचनामे करा, भरपाई द्या

आधीच शेतकरी विविध समस्यांमुळे अडचणीत आहेत. त्यात आता या समस्येची भर पडली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना या संबंधी भेटून निवेदन दिले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्या अंजनादेवी शिवाजीराव पाटील यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com