MLA Suhas Kande : विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा

केंद्र सरकार व राज्यातील सरकार शेतकऱ्यांची हेळसांड करीत असून दररोज कोसळणाऱ्या बाजारभावामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
MLA Suhas Kande
MLA Suhas KandeAgrowon

Nashik News : सध्या विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवावा, असे आवाहन तालुक्यातील पाच माजी आमदारांनी विद्यमान आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांना केले.

शेतकऱ्यांच्या कापूस व कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा या मागणीसाठी सोमवारी (ता. २७) येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे मतदार संघातील माजी आमदार पंकज भुजबळ, अॅड. जगन्नाथ धात्रक, अॅड. अनिल आहेर, राजाभाऊ देशमुख, संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

MLA Suhas Kande
Farmer Protest : कांदे, द्राक्षांसह रस्त्यावर फेकल्या बँक नोटिसा

या आंदोलनामुळे येवला रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती तर लिलावाच्या कामकाजावर परिणाम झाला. आंदोलनादरम्यान माजी आमदारांनी सुहास कांदे यांच्यावर टीका केली.

केंद्र सरकार व राज्यातील सरकार शेतकऱ्यांची हेळसांड करीत असून दररोज कोसळणाऱ्या बाजारभावामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

आम्हीदेखील सत्तारूढ गटाचे आमदार असतानादेखील विधिमंडळात स्वतःच्या सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवीत सभागृहाला निर्णय घेण्यास भाग पाडल्याची आठवण अॅड. आहेर यांनी करून दिली.

शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना नांदगावहून दिल्लीला गेल्यावर शेतकऱ्यांच्या निर्यात धोरणावर कसा निर्णय घेतला याची आठवण पंकज भुजबळ यांनी करून दिली.

MLA Suhas Kande
Onion Rate : कांदा उत्पादकांना ६०० रुपये अनुदान द्या

संजय पवार यांनी आमच्या माजी आमदारांच्या संघटनेत पुढील वर्षी अजून एक सभासद वाढणार असल्याच्या मिश्कल शब्दात खिल्ली उडविली. नायब तहसीलदार कोनकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

काँग्रेस तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विनोद शेलार, अरुण पाटील, संतोष बळीद आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com