Paithan Market Committee : पैठण बाजार समितीच्या सभापतिपदी राजू नाना भुमरे

Paithan Agricultural Produce Market Committee : पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवड प्रक्रिया सोमवारी (ता. २२) पार पडली.
Paithan Market Committee
Paithan Market CommitteeAgrowon

Paithan AMPC Election Update : पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवड प्रक्रिया सोमवारी (ता. २२) पार पडली. सकाळी साडे दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजू नाना भुमरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापती राम एरंडे यांची निवड करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मतदान प्रक्रिया एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार विजयी झाले होते.

यावेळी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अनिल पुरी अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांना पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे, रवींद्र बोबडे, विक्रम भुजंग, बंडू केकान यांनी साह्य केले.

Paithan Market Committee
Jalgaon Jamod Market Committee : जळगाव जामोद कृषी बाजार समिती सभापतिपदी प्रसेनजित पाटील

फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी संचालक शरद नरके, बद्रीनाथ बोंबले, सुभाष मुळे, गंगासागर घनवट, शशिकला हजारे, शिवाजी जाधव, साईनाथ होरकटे, सचिन मोगल, मनिषा खराद, भगवान कारके, महावीर काला, महेश मुंदडा,राजू टेकाळे, संभाजी तवार, राजेंद्र तांबे, विठ्ठल दोरखे पाटील आदि संचालक उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, महानंदचे राज्य संचालक नंदलाल काळे, नाथ संस्थानचे दादा पाटील बारे, रवींद्र काळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबूराव पडळे, मिठु नन्नवरे,खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब पाटील मोरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, गोवर्धन टाक, शेखर पाटील शिंदे,शौकत पठाण, वसंत भोसले, विजय गोरे, अमोल जाधव, नितीन एरंडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com