Maharashtra Politics : राम शिंदे यांची इच्छा विखेंचे टेन्शन वाढविणारी

भाजपचे नेते, नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon

Nagar News : भाजपचे नेते, नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. ‘‘दोन वेळेस मी लोकसभा लढण्याची संधी हुकली. या वेळेस मात्र लोकसभा निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे.’’

आमदार राम शिंदे यांचे हे सूचक वक्तव्य आणि इच्छा मात्र खासदार डॉ. सुजय विखे यांचे टेन्शन वाढविणारी आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी असल्याचे राम शिंदे यांनी नुकतेच नगर येथे बोलताना स्पष्ट केल्याने राजकीय जाणकारही तर्कवितर्क व्यक्त करत आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात अलीकडच्या वीस वर्षांत भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येत आहे. २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जागा सुटली नसल्यामुळे मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर सलग तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांच्या आयोजित डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनही आले.

Maharashtra Politics
Nagar City News : नगर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे ः राम शिंदे

आता पुन्हा त्यांनी २०२४ ची लोकसभा लढण्यासाठी जोरदार तयारी केली. राष्ट्रवादीकडून आमदार नीलेश लंके हे उमेदवार असतील असे गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत.

मित्र भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे आमदार राम शिंदे यांनी सांगितले असल्यामुळे तिथे यांचे टेन्शन आता वाढू लागले आहे. ‘‘

मला पक्ष राज्यसभेवर पाठविणार होता. त्यासाठी तयारी केली होती. परंतु पक्षाने मला विधानपरिषदेवर संधी दिली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे. पक्षाचा आदेश मी मानणार आहे.’’ असे आमदार राम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे २००४ लोकसभा निवडणुकीत खासदार जयंती यांना उमेदवारी मिळण्यासाठी बराच संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com