Electricity : शेतीपंपांच्या वीजतोडणी विरोधात वडाळ्यात ‘रास्ता रोको’

शेतातील डीपी वारंवार जळत असून महावितरण शेतकऱ्याकडून पैसे वसूल करत आहे. वीजबिलाकरिता डीपी बंद करत वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही.
Electricity
Electricity Agrowon

Solapur News : महावितरणने शेतीपंपांची वीज कनेक्शन (Power connection of agricultural pumps) तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेला विरोधासाठी मंगळवारी (ता. १४) सोलापूर-बार्शी रस्त्यावर वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Party) व शेतकऱ्यांच्या वतीने वीज कनेक्शन तोडणीच्या विरोधात ‘रास्ता रोको’ (Rasta Roko) करण्यात आले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादी उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, वडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र साठे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, मनोज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी जिल्हाध्यक्ष साठे म्हणाले, की महावितरणाकडून शेतीचा वीजपुरवठा संपूर्णपणे बंद केला आहे. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कांद्याला भाव नसून, अतिवृष्टी नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही.

Electricity
Agriculture Electricity : शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनची तोडणी थांबवा

शेतातील डीपी वारंवार जळत असून महावितरण शेतकऱ्याकडून पैसे वसूल करत आहे. वीजबिलाकरिता डीपी बंद करत वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही.

वीज कनेक्शन तोडणी विरोधात फडणवीस, भाजप सरकार काहीही बोलत नसून भाजपला मतदान केल्यास तुमचा आत्मघात होईल म्हणत भाजपवर सडकून टीका केली.

वीजतोडणी कनेक्शन तोडणी थांबवण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने या वेळी महावितरणचे उपअभियंता अनिल अंकोलेकर व उत्तर सोलापूर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज निंबाळकर यांना देण्यात आले.

या वेळी हरिभाऊ घाडगे, जयदीप साठे, धनंजय माने, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुनील भोसले, नान्नज ग्रामपंचायत सदस्य दीपक अंधारे, माजी उपसभापती जितेंद्र शीलवंत, नागेश पवार, रानमसलेचे माजी उपसरपंच दयानंद शिंदे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com