Ravikant Tupkar News : रविकांत तुपकरांचा अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न; सोयाबीन-कापूस प्रश्नी टोकाची भूमिका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शनिवारी (ता.11) अंगावर पेट्रोल ओतत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शनिवारी (ता.11) अंगावर पेट्रोल ओतत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तुपकर यांनी सोयाबीन- कापूस प्रश्नाबाबत आणि पीकविम्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीविरुद्ध आत्मदहनाचा इशारा दिला होता.

शनिवारी (ता.११) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंवा एआयसी पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले होते.

त्यानंतर तुपकर यांना बुलढाणा पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु रीही रविकांत तुपकर आत्मदहनाच्या भूमिकेवर ठाम होते.

आंदोलनापूर्वीच त्यांना अटक करण्यात येण्याची शक्यता होती. त्यामुळे रविकांत तुपकर भूमिगत झाले होते.

तुपकरांना रोखण्यासाठी पोलिसांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ताफा तैनात करण्यात आला.

पोलिस ताफ्याला चुकवण्यासाठी दुपारी १ वाजता तुपकरांनी पोलिस वेशात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रवेश केला.

तसेच अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ताबडतोब त्यांना ताब्यात घेतले.

प्रमुख मागण्या

सोयाबीन आणि कापूस दरवाढीचा मुख्य प्रश्न आहे. त्यासाठी कापूस, सूत व डीओसी तसेच सरकीची ढेप निर्यात करण्याला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क २० टक्के करावे, जी. एम. सोयाबीनच्या लागवडीला परवानगी द्यावी, सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा, या मागण्याकडेही सरकार गांभीर्याने पहायला तयार नाही, अशी भूमिका तुपकरांनी मांडली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com