शिवरायांचे स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी सज्ज

युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन
शिवरायांचे स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी सज्ज
Raigad Coronation CeremonyAgrowon

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही, असे सांगत शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी (ता. ६) येथे शिवभक्तांना केले. सरकारने शिवभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करत शिवभक्तांची सोय होत नसेल तर स्वराज्याचा लढा येथूनच सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. संभाजीराजे आणि त्यांचे सुपुत्र शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला. राजसदरेवर कार्यक्रम झाला.

संभाजीराजे म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज यांनी स्वराज्य का निर्माण केले, याचे चिंतन केले पाहिजे. देशाला पहिले स्वातंत्र्य शिवछत्रपतींनी मिळवून दिले. शिवचरित्रातून काय घ्यायचे, हे शिकायला हवे. स्वराज्य स्थापन करताना त्यांनी प्रस्थापित लोक घेतले नाहीत. निष्ठावंत व प्रामाणिक मावळ्यांना घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकार केले.’’

शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीवर जलाभिषेक व दुग्धाभिषेक झाल्यानंतर संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर शिवराई सुवर्ण होनांचा अभिषेक घालण्यात झाला. त्यानंतर राजसदर, नगारखाना, बाजारपेठमार्गे जगदीश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात आली. जगदीश्वर व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com