Maharudra Manganale: जनावरं राखा; पंधरा दिवसांत वजन कमी होईल

तुमचं जनावरांकडं लक्ष असावंच लागतं, नाही तर ते पिकात घुसतं. जनावर डोळे मागे- पुढे फिरवत, गुराख्याचं आपल्याकडे लक्ष आहे की, नाही ते तपासून बघत असतं.
Animal Care
Animal CareAgrowon

Animal Rearing अनेक दिवसानंतर तीन दिवस जनावरं राखली. तीन म्हशी, त्यांची तीन वासरं आणि एक गाय. मला आठवतंय, माझ्या बालपणी शाळेत न जाणाऱ्या मुलाला बाप म्हणायचा, मगं काय जनावरं राकतूस का? तेव्हा जनावरं राखण्याला जी अप्रतिष्ठा होती, ती आता अधिकच वाढलीय.

तेव्हा पैसे देऊन का होईना गुराखी (Cowherd) मिळायचे. आता गुरं राखणारा गुराखी दुर्मिळ बनलाय. कारण ज्या कामाला कसलीच प्रतिष्ठा नाही, ते काम कोणी तरी का करावं?

पण जनावरं राखणं याला जे अडाणीपणाशी जोडतात, तेच खरे अडाणी. कारण नीट जनावरं चारायलाही अक्कल लागतेच! तुमचं जनावरांकडं (Livestock) लक्ष असावंच लागतं, नाही तर ते पिकात घुसतं. जनावर डोळे मागे- पुढे फिरवत, गुराख्याचं आपल्याकडे लक्ष आहे की, नाही ते तपासून बघत असतं.

Animal Care
Maharudra Manganale: मी अॅग्रोवनमध्ये का लिहितो?

माझ्यासाठी हा अनुभव नवा नव्हता. अनेक वर्षांनंतर जनावरं राखताना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो काळ मनातल्या मनात फिरून आलो. एक विशेष सल्ला. जे लोक वजन वाढीमुळे परेशान आहेत, ज्यांचं कशामुळंच वजन कमी होत नाही, त्यांच्यासाठी हा खास सल्ला आहे.

Animal Care
Maharudra Mangnale: उन्हाळ्यातली पानझड

त्यांचे वजन १५ दिवसांत कमी करून देण्याची हमखास हमी. यासाठी कसलीही फी नाही, औषध नाही. त्यांनी एकच गोष्ट करायची. त्यांनी १५ दिवस चार-पाच म्हशी सांभाळाव्यात. ज्यांना गाय ही गोमाता वाटते, त्यांनी एक गाय सांभाळली तरी त्यांना तोच गुण येईल.

या प्रयोगामुळे वजन कमी नाही झालं तर दंड म्हणून दोन हजार रूपये मी देईन. यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची अट नाही, कुठल्याही शिफारशीची गरज नाही. ‘इंडिया'तून कधीही ‘भारता'त या, आपलं स्वागत आहे....

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com