काष्टीत कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास मान्यता

कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती; मंत्रिमंडळाची मान्यता
काष्टीत कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास मान्यता
Dada Bhuse Agrowon

नाशिक : काष्टी (ता. मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलांतर्गत ३ नवीन महाविद्यालयांना राज्याच्या मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापन (Agri Business Management) व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (Food Technology Collge) सुरू करण्यात आले आहे. तर आता कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाने सोमवारी (ता. ६) मान्यता दिल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अंतर्गत काष्टी येथे कृषी विज्ञान संकुलनिर्मिती व या संकुलामध्ये ५ कृषी व संलग्न महाविद्यालये सुरू करण्यास २६ ऑगस्ट २०२० रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२०-२१ मध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व २०२१-२२ मध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. तर आता नव्याने तीन महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू होतील.

कृषी विज्ञान संकुलांतर्गत कृषी शिक्षणाबरोबरच कृषिपूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी निविष्ठानिर्मिती व संशोधन केंद्र आदी कृषिविषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे.

या संकुलामुळे जिल्ह्यात एकत्रितरीत्या कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. कृषी पदवीधरांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच ग्रामपातळीवरील विस्तार कार्यकर्ते, ग्रामसेवक, कृषी मदतनीस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषी संशोधक व आधुनिक शेतकरी यांना साहाय्य करून देशाच्या कृषी क्षेत्रात मौल्यवान योगदान देणे, कृषी आधारित स्टार्टअपअंतर्गत उद्योग सुरू करण्यास मदत करणे आदी बाबी साध्य होण्यास मदत होणार आहे, असे भुसे यांनी नमूद केले.

...अशी असणार शाखानिहाय विद्यार्थी क्षमता

शाखा...विद्यार्थिक्षमता

कृषी महाविद्यालय...६०

उद्यानविद्या महाविद्यालय...६०

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय...४०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com