Dhule-Nandurbar District Bank : धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची विक्रमी वसुली

धुळे जिल्ह्यात १७३२०.१४ लाख (९५ टक्के) आणि नंदुरबार जिल्ह्यात ११८६४.३८ लाख (८७ टक्के) पीककर्ज वसुली झाली.
Dhule DCC Bank
Dhule DCC BankAgrowon

Dhule Bank Update : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (District Central Cooperative Bank) ३१ मार्चअखेर पीककर्जाची एकूण ९२ टक्के वसुली केली आहे. बँकेच्या ६३ वर्षांच्या इतिहासातील ही विक्रमी वसुली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी शनिवारी (ता. १) दिली. श्री. कदमबांडे यांनी याकामी बँकेचे सर्व सभासद, कर्जदार, शेतकरी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

संचालक मंडळाचे सकारात्मक समर्थन व निर्णय प्रक्रियेतील सहभागातून शेतकऱ्यांनी, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक विविध कार्यकारी, आदिवासी वि. का. सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सर्व सभासद, बँकेमार्फत वैयक्तिक पीककर्ज घेणारे सभासद, बँकेचे सर्व सभासद, पंच कमिटी मंडळ व संस्थांचे सचिव आदींनी वसुलीकामी योगदान दिले.

बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजन यामुळेच बँक स्थापनेपासूनचे आतापर्यंतच्या या वर्षातील पीककर्ज वसुलीचे विक्रमी यश प्राप्त झाल्याचे श्री. कदमबांडे यांनी सांगितले.

Dhule DCC Bank
Sangli District Bank : सह्याद्री मोटर्स, स्वप्नपूर्ती शूगर सांगली जिल्हा बॅंकेच्या ताब्यात

धुळे जिल्ह्यात १७३२०.१४ लाख (९५ टक्के) आणि नंदुरबार जिल्ह्यात ११८६४.३८ लाख (८७ टक्के) पीककर्ज वसुली झाली. धुळे जिल्ह्यातील २० हजार ४०४, तर नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ११ हजार १३ अशा एकूण ३१ हजार ४१७ सभासदांकडून २९१८४.५२ लाखांची पीककर्ज वसुली झाली.

तालुकानिहाय पीककर्ज वसुली सभासद संख्या अशी : धुळे उत्तर ३२१३, धुळे दक्षिण ३९५७, साक्री २७९७, शिरपूर ५३३७, शिंदखेडा ५१००, नंदुरबार ३८२६, नवापूर ७३०, शहादा ४८७२, धडगाव ९७५, तळोदा ४७९, अक्कलकुवा १३१. सर्वाधिक पीककर्ज वसुली शिरपूर ५२२०.९१ लाख आणि शिंदखेडा तालुक्यातून ४१७५.३३ लाख झाली असून ती प्रत्येकी ९७ टक्के झाली आहे.

पाच एप्रिलपासून नवीन कर्ज वाटप

बँकेमार्फत २०२३-२०२४ या नवीन हंगामासाठी ५ एप्रिलपासून बँकेशी संलग्न धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखांमार्फत पीककर्ज वितरणास सुरवात होईल.

त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी स्थानिक बँक शाखा संलग्न विविध कार्यकारी व आदिवासी वि. का. सहकारी सोसायटीचे सचिव व बँकेचे शाखा तपासणीस यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून नवीन पीककर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही बँकेचे अध्यक्ष कदमबांडे, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी केले.

Dhule DCC Bank
Beneficiary Bank Approval : लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला बँकांनी तत्काळ मंजुरी द्यावी

तालुकानिहाय पीककर्ज वसुली (लाखांत)

* तालुका - रक्कम - टक्के

* धुळे उत्तर - ३८४.८५ - ९२

* धुळे दक्षिण - ३२०९.१०- ९३

* साक्री - २३२९.९५- ९४

* शिरपूर- ५२२०.९१- ९७

* शिंदखेडा - ४१७५.३३ - ९७

* नंदुरबार- ४३१२.०२ - ८०

* नवापूर- ५५५.९९ - ८३

* शहादा - ५६९८.९३ - ९६

* धडगाव- ५५९.४५ - ७८

* तळोदा - ६२६.७१ - ९२

* अक्कलकुवा- १११.२८ - ५९

* एकूण - २९१८४.५२ - ९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com